डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला… – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated : 22 Feb 2022 06:40 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
Soybean Digital Farming School Aamir Khan
Aamir Khan News Soybean Digital Farming School : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे.  यासाठी सोयाबिन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलं आहे. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या माध्यमातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. डिजिटल पद्धतीने ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असं तो म्हणाला. 
आमिर खान म्हणाला की, सोयाबीन शेतीच्या प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची टीम स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डॉ.मिलिंद देशमुख, डॉ.अनित दुर्गुडे, डॉ.नाद्रा भुते आणि सचिन महाजन. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. जाधव आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील आर.एस.डॉ. राजीव पावरेड आहेत. राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाल्याचे  आमिर खान यांनी सांगितले.
पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ म्हणाले, राज्यात 21 मे ते 3 ऑक्टोबर 2021 दरम्यान या शेतीशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक होते.  ‘सोयाबिन डिजिटल शेती शाळा’ हे पुस्तक ऑनलाइन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना  होणार आहे. या फार्म शाळेसाठी 46 हजार 327 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 197 वॉट्सअप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होता. 13 लाईव्ह प्रश्नोत्तराची सत्र आयोजित करण्यात आली. यामध्ये 5 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन सोयाबिन उत्पन्न वाढीसाठी विविध प्रश्न विचारले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील मराठी भाषिक समुदायांनीही या फार्म स्कूलसाठी नोंदणी केली आहे. पुर्व मशागत ते कापणी असे सोयाबिनविषयक 23 ट्रेनिंग व्हिडीओ तयार करुन 197 वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात आले. त्यामध्ये शेती उत्पन्नाच्या सुधारित पद्धतीविषयी, जसे बियाणे निवड, उगवण क्षमता, तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफवर पेरणी, तण नियंत्रण हात कोळपे, एकात्मिक खत व्यवस्थापन, ग्रेडींग, पॅकींग, मार्केटींग आदी विषयी माहिती पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी यावेळी दिली.
कृषी मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले की, राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या  पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असं भुसे म्हणाले.  पाणी फांऊडेशन ही संस्था अनेक क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्यक्ष जावू शकत नसल्याने शेती क्षेत्रात नवीन प्रयोग म्हणून ‘सोयाबिन डिजिटल शेती शाळा’ या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भुसे म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच सोयाबिन उत्पन्न वाढीस चालना मिळेल. शेतकऱ्याची उत्पादकता व निर्यातक्षम माल कसा वाढविता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यापुढे क्षेत्र आधारित रिर्सोस बँक तसेच कृषि विद्यापिठे व पाणी फाऊंडेशन यांच्याकडून नवीन तज्ज्ञ व्यक्तींची निवड करुन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ज्ञान कसे देता येईल, यावर भर राहणार आहे. शेतकरी बांधवाची प्रगती झाली पाहिजे हा शासनाचा मानस असून यासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही,भुसे यांनी सांगितले.

पोपटराव पवार म्हणाले, मशागतीपासून कापणीपर्यंतचे तंत्रज्ञान अवगत करुन कापणीपासून ते बाजारपेठेपर्यंत कसे नेता येईल, यासाठी कार्यशाळेचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्लॅटफार्मच्या माध्यमातून विविध योजनांचे व्हिडीओ तयार करुन  शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत संबंधित विषय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीसंदर्भात महाराष्ट्र शासन आणि पाणी फाऊंडेशनने मिळून काम केल्यास महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीसाठी सरकारने e-KYCची मुदत वाढवली, ही आहे शेवटची तारीख
Dhule Sugar Factory : गेल्या 12 वर्षापासून शेतकरी साखर कारखाना बंद, धुळ्यातील शिरपूर परीसरातला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत
PM Kisan Scheme : तुम्हालाही 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग लवकर ‘हे’ काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Weather Updates : 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंश ते 44 अंशापर्यंत तापमान राहणार, शेतकऱ्यांनी हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी
Grapes Farmers : द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा पुढाकार, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयोग
Pune Cylinder Blast : पुण्यात गॅस विक्रीचा मुद्दा ऐरणीवर, 25 सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त   
DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला
Jalna News Exclusive : निलंबित करु, आयकर विभागाकरवी धाड टाकू, आ. बबनराव लोणीकरांची महावितरण कर्मचाऱ्याला धमकी
अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला; भाजपला मुख्यमंत्र्यांची हत्या करायची आहे, मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप
Political Crisis In Pakistan: इम्रान खान देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? मंत्र्यांनी केला हा दावा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares