हिंदी | English
गुरुवार २१ एप्रिल २०२२
FOLLOW US :
शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 01:25 AM2022-04-21T01:25:08+5:302022-04-21T01:25:28+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील धुळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान विकास पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा पराभव करून विजय मिळवला .
यामध्ये प्रकाश सोनू सोनवणे व समाधान अंबादास सरोदे हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण गटात अर्जुन विश्वनाथ गायकवाड ,दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, पांडुरंग आनंदा गायकवाड,बाळासाहेब विठ्ठल गायकवाड, राजेंद्र बाळासाहेब गायकवाड, शेखर कारभारी गायकवाड,वाल्मीक पंढरीनाथ जाधव तर सर्वसाधारण स्त्री गटामध्ये शांताबाई नारायण बारहाते, नंदाबाई आबासाहेब गायकवाड, हिराबाई सोन्याबापू गायकवाड तर अनुसूचित जाती जमाती गटामधून नंदाबाई शंकर गायकवाड हे विजयी झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड, पांडुरंग शेळके पाटील, प्रा. एम.पी. गायकवाड, सुनील पाटील उल्हास गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी किसान विकास पॅनलचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
FOLLOW US :
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd
Article Tags:
news