इशारा: … अन्यथा एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही ; पंढरपुरात लाकडी-निंबोणीप्रश्नी घाटणेकर यांचा… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
उजनी धरणातून बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेला पाणी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ही योजना तात्काळ रद्द करा, अन्यथा महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे.
लाकडी-निबोंणी उपसा जलसिंचन योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील पाणी प्रश्न पुन्हा पेटू लागला आहे. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी योजनेला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. रविवारी (दि. १५) येथील चंद्रभागा नदीपात्रात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत ही योजना रद्द होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिला.
उजनी धरणातून कुंभारगाव येथून दोन टीएमसी पाणी उचलून बंद पाइपलाइनने बारामती-इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेसाठी देण्यात येणार आहे. या योजनेसाठी सुमारे ३४८ कोटींच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता ही दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या वेळी भाजप अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे, रिपाइं युवा आघाडीचे प्रदेश सहसचिव दीपक चंदनशिवे, माउली हळणवार, गणेश अंकुशराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares