तब्बल २०० क्विंटल कांदा मोफत वाटला, व्यथित झालेल्या शेतकऱ्याने सांगितलं… – MSN

Written by

बुलडाणा
: कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल ( onion price fall down ) झाले आहेत. शेतातून कांदा बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्च देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विकून मिळत नाहीए. यामुळे एका शेतकऱ्याने तब्बल २०० क्विंटल कांदा मोफत वाटला. कांदा मोफत मिळत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
कांद्याला भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्चही कांदा उत्पादनातून मिळत नाहीए. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या कांद्याने शेतकऱ्यांना रडविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप आंदोलन करुन या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेगावच्या एका शेतकऱ्याने २०० क्विंटल कांदा मोफत वाटला. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून ते शेगावच्या रहिवासी आहेत. त्यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास २ लाख रुपये खर्च आला होता. अडीच ते तीन लाखांचा कांदा होता. पण एकही व्यापारी कांदा घ्यायला तयार नाही. यामुळे तो मोफत द्यावा लागला. आता आपल्यावर कर्ज झाले आहे. खरीपाची पेरणी तोंडावर आली आहे, असं पिंपळे म्हणाले. हा प्रश्न फक्त आपलाच नाही, तर अनेक शेतकऱ्यांचाही आहे, असं त्यांनी सांगितलं.
भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; काय आहे पावसाचा अंदाज आणि कसे असेल मोदींचे भविष्य? वाचा…
कैलास पिंपळे यांनी आपला कांदा खामगाव आणि शेगावच्या बाजारात नेला होता. मात्र भाव तर सोडाच कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने पिंपळे हे हतबल झाले होते. कांदा घेऊन ते घरी परतले. कांदा पडून- पडून खराब होईल म्हणून शेतकरी पिंपळे यांनी कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares