NCP Vidya Chavan I 'भाजपने माफी मागावी, अन्यथा प्रत्येक महिला..' राष्ट्रवादीचा इशारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा ऐकला, तुम्ही कसला इशारा देत आहात?'
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या कार्यक्रमात काल मोठा गोंधळ पाहिला मिळाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
चव्हाण म्हणाल्या, स्मृती इराणी काल पुण्यात आल्या होत्या. एकेकाळी त्याही महागाईच्या विरोधात बोलायच्या. काल महागाई विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी जमले होते. वैशाली नागवडे आणि काही कार्यकर्ते तिथे निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा ऐकला, तुम्ही कसला इशारा देत आहात?, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला आहे.
हेही वाचा: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार
वैशाली नागवडे निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. महिलांना आज घरं कसं चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या भयंकर परिस्थितीत निवेदन दिलेल्या महिलेला थप्पड मारली हे कितपत योग्य आहे?, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे. भाजप कार्यकर्त्यांची ही थप्पड आया बहिणींना मारलेली थपड असून भाजपाने माफी मागितली नाही, तर प्रत्येक महिला भाजपला हिंगा दाखवेल. आम्ही लाठणी मोर्चा घेऊन दिल्लीला जाणार आहोत, असा इशाराही चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.
अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणावर चव्हाण म्हणाल्या, तिने इतक्या मोठ्या नेत्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे कार्यकात्यांकडून अशी आक्रमक प्रतिक्रिया आली आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत महागाईचं समर्थन करतात. कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे? हे त्यांनी सांगावे. सदाभाऊ आनंदात आहेत, कारण त्यांच्या दलालीला फायदा होत आहे. मोदी सरकारमुळे केंद्राची अशी अवस्था झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: NCPचे कार्यकर्ते आक्रमक, केतकी चितळे समर्थनात सदाभाऊंचा यू-टर्न
दरम्यान, पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु असताना महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या वैशाली नागवडे आणि राष्ट्रवादीच्या इतर महिला कार्यकर्त्या बालगंधर्व मंदिर घुसून घोषणाबाजी करत होत्या. यावेळी भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. पण त्याचवेळी वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares