Planet Marathi OTT : महिला दिनानिमित्त 'प्लॅनेट मराठी ओटीटी' कडून स्त्रियांना खास भेट; मिळणार – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Published : 05 Mar 2022 02:25 PM (IST)|Updated : 05 Mar 2022 02:25 PM (IST)
Edited By: प्रियांका कुलकर्णी
planet marathi ott,International Women’s Day 
Planet Marathi OTT :  आठ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day ). मातृत्व आणि कर्तृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलणाऱ्या स्त्रियांसाठी खरंतर प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे. हा दिवस रोजच साजरा व्हावा, यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटी जगभरातील महिलांसाठी घेऊन येत आहे एक खास भेट. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे (Planet Marathi OTT) वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संचालक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्त्रियांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे घर, नोकरी, मुले यांचा ताळमेळ साधत असताना स्त्रियांमधील ‘मी टाईम’ हा कुठेतरी हरवत चालला आहे आणि तो त्यांना परत मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल आजच्या या खास दिनी उचलले आहे. स्त्रियांना त्यांच्या मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. 
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आवडीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. चित्रपट, वेबसिरीज, टॉक शो, संगीत अशी मनोरंजनाची विविध माध्यमे इथे उपलब्ध आहेत. या निमित्ताने आम्हाला जगभरातील स्त्रियांचा सन्मान करण्याची संधी मिळत आहे. ही योजना जगभरातील स्त्रियांसाठी असून त्याचा लाभ केवळ आजच घेता येणार आहे.’
हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Khatron Ke Khiladi : रोहित शेट्टीच्या ‘KKK 12’ मध्ये हे 13 सेलिब्रिटी घेणार भाग; केपटाउनमध्ये करणार खतरनाक स्टंट
Zara Phythian Doctor Strange : ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम झारा फायथियनला 8 वर्षांचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात दोषी ठरली अभिनेत्री
Thech : प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, ‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच
Chethana Raj : कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन; खाजगी रुग्णालयात सर्जरी केल्यानंतर मृत्यू
Aishwarya Rai Bachchan : ‘कान्स’ सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय सहकुटुंब रवाना! एअरपोर्टवर दिसला खास ‘फॅमिली’ अंदाज!
Ram Mandir : ठरलं! अयोध्येत ‘या’ दिवशी विराजमान होणार रामलला, भाविकांना दर्शन कधी मिळणार?
Rupee at All time Low: डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला नीचांकी दर; RBI हस्तक्षेप करणार?
5G Testbed Launch : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G Testbed Launch; म्हणाले, रोजगाराच्या संधी वाढणार
Thomas Cup : ‘एका व्हॉट्सअॅप ग्रुपने कप जिंकण्यास मदत केली,’ विजयानंतर एचएस प्रणॉय म्हणाला… 
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares