Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.
AIN NEWS TV – शोध सत्याचा, वेध बातमीचा !
जालना(रावसाहेब अंभोरे- ए आय एन न्यूज जालना): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज परत एकदा तालुक्यातील पिक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा खात्यात जमा करा व शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा अशी आक्रमक भूमिका आज कृषी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांनी घेतली.
जर पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही आणि विमा कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही तर रिलायन्स विमा कंपनीची प्रेत यात्रा कृषी कार्यालयावर घेऊन येऊ व तेथे अंत्यसंस्कार करू असा इशारा या वेळी मयुर बोर्डे यांनी दिला. मागील अनेक महिन्यापासून स्वाभिमानी पिक विम्याच्या प्रश्नावर आक्रमक आहे,बऱ्याच वेळा पिक विम्याची आंदोलन सुद्धा केले कृषी मंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा निवेदन दिले पण तरी देखील विमा धारकांना हवा तसा न्याय मिळाला नाही. विमा कंपन्या व सरकार मधील मंत्री व कृषी अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचे सुद्धा या वेळी त्यांनी सांगितले. प्रीमियम पेक्षा कमी मोबदला देऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली तसेच नुकसान होऊन महिने उलटून गेले तरी देखील विमा धारकांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही अशा फसव्या कंपनीवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मयुर बोर्डे यांनी केली.
पंधरा दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलन अटळ आहे, असा इशारा या वेळी दिला. या प्रसंगी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे, तालुका उपाध्यक्ष गजानन भोपळे, ता.उपाध्यक्ष हनुमंता मुरकुटे, योगेश पायघन, कैलास राऊत,राजु गायकवाड, कैलास वायभट, सुदाम शेवत्रे, सतीश नानगुडे, वैभव शेवत्रे, रमेश पठाडे, समाधान भोपळे, केशव भोपळे, पवन पहिलवान, नारायण भोपळे, राजु खेडेकर, प्रल्हाद बाबा भोपळे, योगेश भोपळे, जगन लोखंडे, रामेश्वर शेवत्रे, इत्यादिसह कार्यकर्ते तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
Prev Post
2566 वर्षांनंतरही बुद्ध प्रकाश सर्व जगावर राज्य करीत आहे
संजय मोरे पाटील यांना प्रतिष्ठेचा वि. ग.राऊळ स्मृती पुरस्कार प्रदान
मिरचीला यंदा तरी भाव मिळेल का शेतकर्यांना आशा
बोळेगाव येथील शेतकऱ्यांचा कडाबा जळून खाक
सुशिक्षित तरुणामुळे सेलू तालुक्यातील आंबा अमृतसर हैदराबाद मार्केट मध्ये
सिना कोळेगाव धरणाच्या दरवाजेद्वारे उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सोडले
लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या पैशातून जाहिरातबाजी करून…
Your email address will not be published.
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
नायगाव तालुक्यात ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
पराभूत काँग्रेसची खरी लढत कोणाशी?
देशात कोरोनाचे 2897 नवीन रुग्ण आणि 54 मृत्यू!
ग्रामसेवक घुगेचा मनमानी कारभाराला कंटाळून सरपंच व ग्रामस्थांनी ठोकले…
Recent Posts
पंधरा दिवसात पिक विमा न मिळाल्यास रिलायन्स विमा कंपनीची…
2566 वर्षांनंतरही बुद्ध प्रकाश सर्व जगावर राज्य करीत आहे
शेकडो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर…
वाळूज औरंगाबाद व क्रिएटिव्ह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…