विदर्भात साखर उद्योगाला चालना मिळणार, साखर कारखाने सुरू करण्यासाठी समिती स्थापन – News18 लोकमत

Written by

महाराष्ट्रातही OBC आरक्षणासह निवडणुका? SC च्या निर्णयानंतर भुजबळांचं मोठं विधान
BJP-NCP राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय काय?
VIDEO: मिरा भाईंदर महानगरपालिकेत जोरदार राडा, नगरसेविका आपसात भिडल्या
"राज्यसभेसाठी घोडेबाजार; आकडे आणि मोड दोन्ही.."म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय
मुंबई, 12 मे : विदर्भातील सहकारी साखर कारखान्यांच्या (vidarbha sugar factory) अडीअडचणींवरील उपाययोजना आणि कारखान्यांना टिकविण्यासंदर्भात धोरण आखण्यासाठी शासन स्तरावर अभ्यास समिती गठित करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (minister balasaheb patil) यांनी दिले.
जय किसान सहकारी साखर कारखाना (sugar factory) लि., बोदेगाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ सुरु करण्याबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी पाटील बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री माणिकराव ठाकरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सहकारमंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हितासाठी विदर्भातील सहकारी साखर कारखाने टिकविणे गरजेचे आहे. यावर्षी राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. या भागातील सहकारी कारखान्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवून  त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे. 
हे ही वाचा : मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून हिंगोलीतील कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
सन 2009 पासून बंद असलेला बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून हा कारखाना विक्री/  भाडेतत्वावर देण्याकरिता 2017 व 2022 मध्ये निविदा मागविण्यात आली होती. परंतु निविदा प्राप्त झालेली नव्हती. सद्यस्थितीत  हा कारखाना विक्री/ भाडेतत्वावर देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक संस्था, कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांना सवलती देण्याबाबत शासन सहकार्य करेल असे पाटील म्हणाले.
राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू
आहे. यंदाच्या वर्षी राज्याने साखर उत्पादनाचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. 9 मे पर्यंत राज्यात 1,288.52 लाख टन उसाचे गाळप झाले असून 134.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात दिवाळीनंतर 198 साखर कारखाने सुरू करण्यात आले होते त्यापैकी 106 कारखान्यांचा हंगाम संपला आहे. 23 लाख टन ऊस शिल्लक असताना, अंतिम साखर उत्पादनाचा आकडा 135 लाख टनांवर जाण्याची शक्यता असल्याचे मत गायकवाड यांनी सांगितले.
साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा हंगाम मे अखेर संपणार आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.
''गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'', नाना पटोलेंचा गंभीर आरोप
JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 1,25,000 रुपये पगाराची नोकरी; त्वरा करा; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज
"मी राजा होऊ शकत नाही म्हणून… जनता दरबार ऐवजी लोकसंवाद नाव" नितीन राऊतांचा राष्ट्रवादीवर निशाणा
असा नराधम नवरा नकोच, लग्नानंतर एक मुलगा, सहा वर्षांनंतरही…, गोंदियातील धक्कादायक घटना
Vidarbha farmers : विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणारी नवी योजना; उत्पादन खर्चही कमी
पोलिसांनी 3000 मागितले, खंडणी दिली नाही म्हणून जबर मारहाण, नागपूरची धक्कादायक घटना
BMC Election 2022: मुंबईतील प्रभाग रचनेवरुन काँग्रेस नाराज, नाना पटोलेंनी दिला थेट कोर्टात जाण्याचा इशारा
Tadoba Sanctuary : ताडोबाला जायचा प्लॅन करताय? सावधान, Online Booking करण्याआधी हे वाचा
RSS मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?, रेकी करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अटकेत; ATS ची कारवाई
heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद
धक्कादायक! नागपूरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, म्होरक्या निघाली पेन्शनर महिला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Sugar facrtory, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production, Vidarbha

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares