राहुरी: कृषी विषयक धोरणे ठरवताना शेतकरीच केंद्रस्थानी असावा; राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत प… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे विपणन ही मोठी समस्या आहे. शेती उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड दिल्यास नक्कीच उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यासाठी कृषि विषयक धोरण ठरवताना शेतकरी केंद्रस्थानी असावा, अशी अपेक्षा कुलगुरू डाॅ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.
पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचे राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तीन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गासाठी आगमन झाले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तीन दिवसांच्या दौऱ्यात कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, फळपिकांचे प्रात्यक्षिक क्षेत्र, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, उद्यानविद्या, फळ रोपवाटिका, कोरडवाहू संशोधन प्रकल्प, गो संशोधन प्रकल्प, सुक्ष्म सिंचन पार्क, विद्यापीठ ग्रंथालय, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा, बेकरी युनिट तसेच समन्वित अवजारे या प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेतली. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, भारत देश व राज्य विविध जैवविविधतेने संपन्न असले तरी या जैवविविधतेकडे आपले म्हणावे तसे लक्ष राहिले नाही. बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. विजय शेलार यांनी कृषी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदेची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर तर प्रशासन विभागातील उपकुलसचिव व्ही. टी. पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या स्टॅट्युट संबंधी माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares