उसाची धास्ती: शेतकऱ्यांना शिल्लक उसाची धास्ती, कांद्यानेही शेतकऱ्यांना रडवले – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
सध्या शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला कोणी वाली राहिले नाही. अशीच परिस्थिती नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव व तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली. गेल्या अनेक वर्षांपासून येणाऱ्या अस्मानी संकटाला तोंड देत कसाबसा सावरत शेतकरी आपले काम करत आहे. कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी पूर परिस्थिती यातच या कष्टकरी शेतकऱ्याच मरण झाले. हक्काचे पाणी मिळायला उशीर, तर कधी पाणी असून विजेच्या समस्या यातून मार्ग काढत हा शेतकरी काबाडकष्ट करून आपला संसार चालवत जगाला अन्नधान्य पुरवतो. पण मात्र या वर्षी बेलपिंपळगाव व परिसरातील सर्व शेतकरी हातघाईवर आले. याला कारण म्हणजे पावसाळ्याची चाहूल लागली तरी देखील शेकडो एकर क्षेत्रावर आज देखील ऊस पीक सतरा ते आठरा महिने होऊन देखील उभा आहे.
आज ते कारखान्यात गळपासाठी जातील की नाही? याची खात्री नाही. इकडून तिकडून जर तोडणी मिळाली तर एकरी दहा ते पंधरा हजार रुपये प्रति एकरी खर्च मोजावा लागत आहे. आज मितीला त्या उसाला वजन नाही आहे. तो ऊस गावातील शेतकरी आपल्या हाताने पेटवून देत आहे. रोज गावात किमान दोन ते तीन शेतकरी आपला काबाडकष्ट करून पोटच्या पोरा सारख जपलेल पीक आपल्या हाताने डोळ्यात अश्रू आणून पेटवत आहे. याच वाईट वाटत तरी देखील या वर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी कारखानदार यांनी प्रयत्न केले पाहिजे.
तशीच परिस्थिती कांदा पिकाची झाली. तालुक्यात सुमारे १९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. एकरी हजारो रुपये खर्च करून हे पीक घेतात. पण या काही दिवसात कांद्याला मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा कसा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. गावातील अनेक शेतकऱ्यांनी प्रतिकिलो एक रुपये प्रमाणे कांदा विकला असून त्यांचा खर्च देखील वसूल झाला नाही. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी मेटाकुटीला आले असून बोलतात उसाने जाळलं आणि कांद्याने रडवल पुढील वर्षी मात्र या भागात ऊस व कांदा क्षेत्र कमी होतील. काबाडकष्ट करून जर अशी परिस्थिती या जगाच्या पोशिंद्या वर येत असेल, तर भविष्यात तरुणांनी या क्षेत्रात यावे का नाही हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
निम्या कांदा पिकावर फिरवला रोटाव्हेटर
मी एक एकर क्षेत्रावर कांदा पीक घेतले. चांगल्या प्रकारे खर्च करून काबाडकष्ट करत हे कांदा पीक उत्पादन घेतले. पण मात्र ज्या वेळी मी कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो, तर मात्र माझ्या मालाला प्रतिकिलोला एक रुपये भाव मिळाला. त्यामुळे मी उर्वरित जवळपास निम्मा कांदा शेतात टाकून त्यावर ट्रॅक्टरच्या रोटा मारून टाकला. भविष्यात जर कांद्याला आणि शेती मालाला भाव मिळाला नाही, तर मात्र शेती करावी का नाही्र हा विचार माझ्या बरोबर इतर शेतकरी करीत आहे. ” विजय गोसावी, शेतकरी, बेलपिंपळगाव.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares