Nana Patole : मुंबई : राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज मला ऐकवला तो माझाच होता. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर कोर्टाच्या चार्जशीटमध्ये देखील याची नोंद येणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे. दरम्यान, कथित फोन टॅपिंग प्रकरणी (Phone tapping case) नाना पटोले (Nana Patole) यांची आज चौकशी करण्यात आली असून, फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांनी नाना पटोले यांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती दिली.
अधिक वाचा : 12वीच्या या मुलाने डाळ-भात खाऊनसुद्धा कमी केले 35 किलो वजन
दरम्यान, पुढे बोलताना, नाना पटोले यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ड्रग्जच्या धंदा करणारा अमजद खान असं नाव देऊन माझ्या कॉलचं रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने पदाचा दुरुपयोग करुन हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. मी अमजद खान, तर आताचे जय-विरु हे राजकीय खलनायक आहेत. पण आता तपासातून रश्मी शुक्ला यांचा बोलविता धनी समोर येणार असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राजकीय द्वेषापोटी माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येणार असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यांनी माझा जबाब नोंदवला आहे. माझं फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवलं. तो आवाज माझाच होता हे मी कबूल केलं असून, शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या फोन्स कॉलमध्ये होती. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला विरोध यात स्पष्ट होत होता असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : Mothers Day निमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस सरकारमुळे लागलं. ओबीसी आरक्षणासहित निवडणूका घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चीफ जस्टीस यांना भेटले. कायदेशीर बाबींवर चीफ जस्टीस काय भूमिका घेतात हे समजेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर ओबीसी आरक्षणावरुन आरोप केला. ते खोटे बोलताय आणि रेटून बोलतायत. असं म्हणत पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
अधिक वाचा : रोहित शर्माच्या षटकाराने गेंड्यांना भेट म्हणून मिळाले 5 लाख
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.