मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकल्पाविरोधात शिवसेना आमदाराचे उपोषण!
बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहेत. तसेच महामार्गाच्या खाली ठेवलेले अंडर पास हे अतिशय छोटे असून त्यातून बैलगाडी सुद्धा जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत. त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याचं समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात मेहकर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे.
समृद्धी महामार्गांच्या कामामुळे मेहकर, लोणार तालुक्यातील जवळपास शंभर किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. ते तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, पालखी मार्ग तात्काळ दुरुस्ती करून द्यावां, शेतकऱ्यांना रस्ते करून द्यावे, या मागण्यांसाठी हे आमरण उपोषण शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदाराच हे आंदोलन असल्याने आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Article Tags:
news