देवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
एक वर्ष भाजपची दातखिळी का बसली..?
शिवसेना नेते थरवळ; अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच आंदोलन
देवरूख, ता. २४ ः देवरूख-रत्नागिरी रस्त्याच्या कामामध्ये सेनेला पोटशूळ उठवण्याचे काहीही कारण नाही. शासकीय अधिकारी वर्गाशी असलेले लागेबांधे असल्यानेच त्यांना पाठीशी घालण्यासाठीच आंदोलन होते, हे सुशांत मुळ्ये यांनी कबूल करत आमच्या म्हणण्याला दुजोराच दिल्याने १ वर्ष भाजपची दातखिळी का बसली होती, हेच सिद्ध झाल असा पलटवार सेनेचे युवा अधिकारी मुन्ना थरवळ यांनी केला आहे.
थरवळ म्हणाले, तालुका भाजपा कामे न करता फक्त श्रेय मिळवण्यासाठीच आंदोलनाची नौटंकी करतेय. देवरू़ख-तळेकांटे हा रस्ता सा. बां. च्या अधिपत्याखाली आहे. त्या रस्त्याचे कमी-जास्त पत्रक महसूल विभागाने विभागणी केली नसल्यानेच जमीनमालकांनी ७/१२ वर नाव नोंद असल्यानेच तक्रार केली. यावर तोडगा काढण्यासाठी संबधित अधिकारी, सरपंच व शेतकरी यांच्या बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू आहेत. त्यावर ठोस मार्ग येत्या ८ दिवसांत निघेलच. हे करत असताना पावसाळ्यात जनता, प्रवासी व चालकांची गैरसोय होऊ नये, अपघात टाळावे याच मुख्य उद्देशाने आधी आहे ते काम करून सामान्यांना त्रासातून मुक्तता मिळावी, यासाठी सर्वांना बरोबर घेत काम सुरू केले गेले. ते काम सुरू झाल्याने आपल्या श्रेयवादासाठीची नौटंकी उघडी पडल्याने ५ मीटर रस्ता का ७ मीटरचा का नाही? असे विचारून हे काम बंद व्हावे व जनतेला त्रास व्हावा, हाच हेतू त्यामुळे स्पष्टपणे सिद्ध होतोय. आमच्या पक्षाच्या तत्कालीन आमदाराला निवडणुकीत आपण युती धर्म न पाळता युती असूनही गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला जनाधार म्हणजे काय ते शिकवू नये. आम्ही जनसामान्य जनतेचा विचार करणारे लोक आहोत. म्हणूनच स्थानिक स्वराज्यसंस्थेत २५ वर्षे आम्हाला जनतेने जनाधार दिलाय. आपल्या त्या भागातील तालुक्यातील एकमेव पंचायत सदस्या यांनी यावर का लक्ष दिले नाही. जनता जनार्दनाची सेवा करताना मेवा खाणारे आम्ही नाही, असेही थरवळ यांनी नमुद केले.

चौकट
..तरच जनाधार वाढेल
आपली नगरपंचायतीत सत्ता आहे. तिथे काय दिवे लावताय, हे जनता पाहातच आहे. डंपिग ग्राऊंडसह अनेक कामांचे आत्मपरीक्षण करा. आपल्या पक्षात जुन्याजाणत्यांना बाहेर काढून पक्षात नवीन आलेले काय करतात, ते पाहावे. आपण शिस्तप्रिय संघाचे स्वयंसेवक आहात. मग शहराचे विकासकामांचे विकेंद्रीकरण कोण करतंय याचेही आत्मपरीक्षण करा. आपले वरिष्ठ आता तालुक्यासह शहराकडे लक्ष का देत नाहीत? अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहेत? यावर गांभीर्याने लक्ष द्या तरच जनाधार वाढेल, असा सल्लाही थरवळ यांनी दिला.
———–
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares