बहरलेल्या कणसालाच कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल – तरुण भारत – तरुण भारत

Written by

मयेतील शेतकऱयांसमोर संकट. सलग दुसऱया वषी भातपिकाची हानी. पावसामुळे पिक आडवे होऊन भाताला आले कोंब. सुमारे 100 क्व?िटल भातपिकाची हानी.
डिचोली/प्रतिनिधी
 पावसाळी पिकाची परतीच्या पावसामुळे हानी तर उन्हाळी पिकाची मोन्स?नपूर्व पावसामुळे हानी हे समीकरण सध्या मयेतील आणि राज्यातील बहुतेक शेतकऱयांच्या वाटय़ाला आले आहे. मातीशी आजही आपले नाते जपून ठेवणाऱया शेतकऱयांच्या पदरी आज केवळ निराशा आणि नुकसानीच पडत आहे. गेली दोन वर्षे सुरळीत पिकासाठी शेतकऱयांचा संघर्ष चालूच आहे. परंतु आस्मानी संकटे एकावर एक शेतकऱयांच्या तोंडातून घास हिरावून नेत आहे. बहरलेली कणसे जोरदार पावसामुळे आडवी होऊन शेतात तुंबलेल्या पाण्यात कणसातील भातालाच कोंब फुटले असल्याने ह्रदयावर दडग ठेऊन शेतकऱयांना हाता तोंडाशी आलेले पिक नाही होताना पहावे लागत आहे.
   डिचोली तालुक्मयातील मये या गावातील शेतकऱयांनी अजूनही शेती करण्याची परंपरा जपली आहे. आजच्या महागाईच्या आणि आधुनिक जमान्यात शेतात काम करणारे कुशल कामगार मिळणे दुरापास्त झाले आहे. तरीही ज्यादा मोबदला देऊन कामगारांची व्यवस्था करून शेतांची मशागत करणे ते कापणी करणे या कामासाठी मोठा खर्च केला जातो. मात्र हे पिक पूर्णपणे घरी नेण्यची संधी गेली दोन वर्षे शेतकऱयांकडून पावसाने हिरावून नेली आहे.
  मयेतील “पैटीच्या खल्लार” या शेतात शेतकऱयांसमवेत संवाद साधून पाहणी केली असता भातपिकाची आणि शेतकऱयांच्या कष्टांची कशाप्रकारे नासाडी झाली आहे, ते दिसून आले. पाऊस संपल्यानंतर लगेच दुसऱया पिकासाठी शेतांची तयारी करणे. व त्यासाठी भातलागवड करणे. या कामांसाठी शेतकऱयांना खर्च येतोच. शिवाय त्यात त्याचे कष्ट आणि मेहनत असते. शेतात कतसे बहरून कापणी आणि मळणीसाठी तयार झालेली कणसे पावसामुळे आडवी झाली. शेतात तुंबून राहिलेल्या पाण्यामुळे कणसावरील भातालाच कोंब फुटल्याने सर्व भात पिक वाया गेले आहे. तसेच पाण्यात राहिल्याने बऱयाच प्रमाणात भात कुजलेही आहे.
  मयेतील शेतकरी हे सदैव कष्ट करून शेतात राबतात. पैटीच्या खल्लार हे शेत आजतागायत कधीच पडीक ठेवलेले नाही. सुमारे 17 – 18 शेतकरी हि शेते करतात. या शेतात मशीन येत नाही. तरीही शेतकरी आपल्या हाताने शेतजमीन खोदून लागवड करतात. त्यानंतरचे सुमारे तीन महिने हे शेतकरी शेतातच असतात. परंतु हे शेत पिकल्यानंतर त्याचे पिक हातात कधीच येत नाही. त्याची नासाडीच अधिक होते. गेली दोन वर्षे हाच प्रकार सुरू आहे. असे शेतकरी सखाराम पेडणेकर, अर्जुन नाईक, चंद्रकांत नाईक, आनंदी नाईक या शेकऱयांनी सांगितले.
खाणींमुळे शेतातील पाण्याचा निचर होत नाही
  याचे नेमके कारण म्हणजे खनिज खाण व्यवसायातून शेतात आलेल्या मातीमुळे तसेच शेतातील पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात खनिज माती भरल्याने पाणी शेताबाहेर जात नाही. परिणामी शेतात पाणी तुंबून राहते व भातपिक कुजते. हि शेते खाणींच्या तळाशीच असल्याने हि समस्या गंभीर बनली आहे. या प्रकरणाची सरकारला वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात न्यायालयानेही निर्देश दिलेले आहेत. परंतु त्याकडेही कानाडोळा केला जात आहे. सरकारला या विषयाचे गांभिर्यच नसल्याने शेतकऱयांना नुकसानी सोसावी लागत आहे. असे सखाराम पेडणेकर यांनी म्हटले.
सुमारे 100 क्व?िटल भातपिकाची नुकसानी
   या शेतात शेतकरी मोठय़ा प्रमाणात भाताचे पाक घेतात. या पिकावर शेतकरी आपल्या घर संसाराची गुजराण करतात. घरात आवश्यकतेनुसार भात ठेऊन अतिरिक्त भाताची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱयांच्या खिशात काही अंशी पैसे येतात. परंतु गेली दोन वर्षे या पिकावर पावसाचे पाणी आणि शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने नुकसानीच शेतकऱयांना सोसावी लागत आहे. या मोसमात शेयकऱयांचे सुमारे 100 क्व?िटल भात पिक निकामी झाले आहे. त्यामुळे प्रंचड आर्थिक नुकसानी शेतकऱयांना झाली आहे. असे सखाराम पेडणेकर यांनी सांगितले.
  हार्वेस्टिंग यंत्र एकच असल्याने समस्या
शेतातील काही शेतकऱयांनी कापणी करून भाताची कणसे एकत्रित करून ठेवले आहे. परंतु ती न्यायला मिळत नाही. सरकारतर्फे सवलतीच्या दराने हार्वेस्टिंग यंत्र पुरविले जाते. परंतु डिचोली कृषी अधिकारी कार्यालयाकडे केवळ एकच यंत्र असल्याने ते वेळेत पोहोचू शकले नाही. मयेतील या शेतात जर गेल्यावेळीच्या पावसापूर्वी सदर हार्वेस्टिंग यंत्र आले असते तर सर्व भातपिक सहिसलामत हातात आले असते. पण यंत्र वेळेत न आल्याने शेतकऱयांना पिकावर पाणी सोडावे लागले, असेही शेतकरी सखाराम पेडणेकर यांनी सांगितले.
देवाच्या भितीपोटी भात कापणी व मळणी करणार
 शेतातील भात पिकाची झालेली नासाडी पाहता या भाताचा आता काहीच उपयोग होणार नाही. भाताला वास येणार. परंतु सदर भात पिक शेतात तसेच सोडू नये म्हणून देवाच्या भितीपोटी भाताची कापणी व मळणी करणार. या भाताचा नंतर काहीही उपयोग नाही. जे काम हार्वेस्टिंग यंत्राद्वारे दोन हजार रूपयांनी होत होते तेच काम माणूस घालून सुमारे पंधरा हजार रूपये खर्चून केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भातही पाण्यात आणि पैसेही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे  सखाराम पेडणेकर, अर्जुन नाईक, चंद्रकांत नाईक, आनंदी नाईक या शेकऱयांनी सांगितले.
  सरकारने नुकसान भरपाई द्यावी
पावसामुळे शेतात तुंबलेले पाणी, पाण्याचा योग्य निचना नाही तसेच अती पावसामुळे पिक आडवे झाल्याने सर्व पिक नष्ट झाले आहे. आता सदर भात पिक काढूनही काहिच फायदा नाही. या भातपाकासाठी प्रत्येक शेतकऱयाने मोठा आर्थिक खर्च केला आहे. त्यांची मोठी मेहनतही आहेच. या सर्वांवर पाणी फेरले गेले आहे. त्यासाठी आता सरकारनेच या शेतकऱयांना आधार देत नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच पाण्याचा नाचरा व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी शेतकरी गणेश नाईक व तातो परब यांनी केली आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares