मागणी: अतिक्रमित जमीन शेतीयुक्त करण्याची मोहीम राबवा ; पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अतिक्रमण मुक्त मोहिम राबविण्यापेक्षा अतिक्रमण जमीन शेतीयुक्त करण्याची मोहिम राबवा या मागणीसाठी तालुक्यातील महान येथील शेतकरी व बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य शेख रफिक शेख मजिद यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शीटाकळी यांना निवेदन दिले आहे. महान, झोडगा, हातोला, सारकिन्ही, जांभरूण, कोथळी टिटवा, राहित व इतरही गावातील भूमिहिन लोक बऱ्याच वर्षांपासून शेतीचे अतिक्रमण करून त्यावर जिवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात. दरम्यान २०२२ -२३ च्या खरीप हंगाम पेरणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ५३ नुसार अतिक्रमण मुक्त करण्याऐवजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधीकार मंडळ निरीक्षक कर्तव्य व कामे नियम १९७० मधील नियम १७ प्रमाणे अतिक्रमण जमीन शेतीयुक्त करण्याची मोहिम राबविण्यात यावी. यापूर्वी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदीशकुमार इंगळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेऊन अतिक्रमणमुक्त मोहिम राबविण्यापूर्वी शेतीची अतिक्रमण वगळूनच मोहिम राबविण्यात यावी यासाठी २५ मे रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन अतिक्रमण मुक्त मोहिम राबवून वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता संघटनेचे प्रणेते जगदिशकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता प्रत्येक अतिक्रमणधारकांनी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. परंतु उपविभागीय अधिकारी यांच्या मौखीक आदेशावरून जर शेतीची अतिक्रमणे निष्काशीत करण्याची मोहिम राबविली जात असेल तर शेतीची अतिक्रमणे वगळूनच अतिक्रमण मुक्त मोहिम राबवा, असे निर्देश ग्रामपंचायतीला द्या अन्यथा गाव तिथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शेख कलिम शेख रफीक, जब्बार शहा, मनवर शहा, ज्ञानदेव अंभोरे, दिलावर खॉ, शेख जिलानी, भिमराव खरात आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares