Development of Jejuri Temple Fort | पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून… – Policenama

Written by


Development of Jejuri Temple Fort | पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून जेजुरी गडाचा…
Kirit Somaiya On Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांचे गंभीर आरोप;…
Pune Crime | सराईत गुन्हेगार सनी हिवाळेच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हडपसरमध्ये 17…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Development of Jejuri Temple Fort | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा देवाच्या श्री क्षेत्र जेजुरी गडाचा (Development of Jejuri Temple Fort) कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत जेजुरी गडाच्या विकासासाठी 109.57 कोटींच्या पहिल्या कामास मान्यता देण्यात आली आहे. गडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपणे आवश्यक असल्याने ज्या संस्थेला पुरातत्वीय जाण आहे अशा संस्थेकडून कामे करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जेजुरी गडावरील मंदिराचे संवर्धन करताना परिसरात असणाऱ्या इतर मंदिरेही पुरातत्व विभागाने (Department of Archeology) संरक्षित करावीत असेही ठाकरे यांनी सांगितले. (Development of Jejuri Temple Fort)
विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिर आणि गड संवर्धनाबरोबर जल व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबविण्यासाठी डागडुजी, वीज आणि पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुर्नवापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.
तज्ज्ञांमार्फतच कामाची सूचना –
अजित पवार म्हणाले, ”ऐतिहासिक वास्तूंवर झाडे उगवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी याशिवाय दगडांवर रंगरंगोटी न करता ते मुळ स्वरूपात ठेवावे. ही कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात यावीत.” तर अशोक चव्हाण यांनी ‘पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील कामे या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फतच करावीत,’ अशी सूचना केली
Web Title : Development of Jejuri Temple Fort | 110 crore fund for jejuri temple fort
approval for first phase work maharashtra state government

 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
 
Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज
 
Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी
 
Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
Prev Post
Kirit Somaiya On Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले – ‘हेमंत करकरेंची हत्या कोणी केली ?’
Next Post
Walnut Shell Uses | खुपच कामाची आहेत अक्रोडची सालं, बेकार समजून फेकून देण्यापेक्षा ‘या’ कामाकरिता करा उपयोग, जाणून घ्यामनोरंजन
Avika Gor Stunning Look | ‘बालिका वधू’ च्या…
Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…
Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनने फोटोसाठी दिला…
Janhvi Kapoor Superbold Look | डीपनेक ड्रेस घालून बोल्ड झाली…
Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं पारदर्शक पॅन्ट…
Recently Updated
Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी…
Pune Crime | कोंढव्यात निवडणूक निर्णय अधिकारी महिलेला…
Pune Pimpri Crime | महिलेला लघवी पाजण्याच्या प्रयत्न…
MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात…
Latest Updates..
Walnut Shell Uses | खुपच कामाची आहेत अक्रोडची सालं, बेकार…
Development of Jejuri Temple Fort | पुरातत्वीय जाण असलेल्या…
Kirit Somaiya On Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं नाव…
Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे…
PM Kisan योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ?…
Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’…
SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून…
Blood Circulation Problem Symptoms | चेहर्‍यावरील…
Pune Crime | सराईत गुन्हेगार सनी हिवाळेच्या खूनाचा बदला…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Walnut Shell Uses | खुपच कामाची आहेत अक्रोडची सालं, बेकार समजून फेकून…
This Week
Pune Crime | शेजाऱ्याच्या घरात चोरी करुन खरेदी केले पिस्टल आणि महागडे…
Bhangire Pramod alias Nana Vasant | ‘शहरी गरीब योजना…
Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती…
Paytm द्वारे या पध्दतीनं मोबाईल केला रिचार्ज तर मिळू शकतो 1000…
Most Read..
Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण
Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे
SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares