Nashik Students Scholarship : नाशिक जिल्ह्यातील हजारो विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली कुठे, – ABP Majha

Written by

By: गोकुळ पवार | Updated at : 24 May 2022 06:53 PM (IST)

Scholarship
Nashik Students Scholarship : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crisis) कमी झाल्यानंतर शाळा महाविद्यालय जोमात सुरु झाले आहेत. मात्र राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीपासून (scholarship) जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक विदयार्थी वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. 
राज्यभरातील अनुसूचित जाती- जमाती, तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मध्यंतरी २०२० तें २०२१ या कालावधीत कोरोनाने थैमान घातले. यामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. मात्र शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु होता. या काळात विदयार्थी आर्थिक अडचणीत असताना त्यांनी प्रवेश घेत शैक्षणिक वर्ष सुरु ठेवले. शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील १७०० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे आकडेवारी समोर आली आहे. 
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यालय व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एससी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी व मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. शैक्षणिक सत्र २०२०-२१ आणि २१-२२ साठी सुद्धा जिल्ह्यातील नव्याने प्रवेशित व रिनीव्हल असणाऱ्यां विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री-शिपसाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्यापैकी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला तरी अद्यापही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना फ्री-शिपच्या रक्कमेची सुद्धा प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज करूनही अद्यापर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने आगामी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
नाशिकच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे म्हणाले कि, जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. यासंबंधी महाविद्यालय स्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरु असून आजच या बैठक पार पडली. ज्या ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्या ठिकाणी समाज कल्याण कडून समता दूत पाठवून सदर समस्या मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ निकाली काढावे, यासाठी विशष पाठपुरावा सुरु आहे. 

प्रलंबित अर्जांची स्थिती                                                                                                                                                                                                                                                                                                                              सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. यामध्ये जवळपास १७०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा अपुऱ्या फी, अपुऱ्या कागदपत्रे आदींमुळे महाविद्यलयालयाकडून अर्ज पुढे पाठवला जात नाही. 
निर्वाहभत्त्याच काय? 
नाशिकच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना गेल्या दोन वर्षांपासून मासिक निर्वाह भत्ता मिळाला नसल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नाशिक येथील सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विदयार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्त वसावे यांना या सदर्भांत निवेदन दिले आहे. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मिहीर गजबे म्हणाले कि, सदर विद्यार्थी हे सर्व मजूर, शेतकरी कुटुंबातील असून कोरोना कालावधीमध्ये कुटुंबीयांनी कर्ज काढून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना कोविड काळातील खर्च देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्वच वसतिगृहातील निर्वाह भत्ता मिळाला नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या : 
Nashik Incident : आंबे पाडणे पडले महागात, नाशिकच्या अभियंत्यांचा मृत्यू
Nashik NMC Election : नाशिक मनपा मतदानासाठी देणार दीड मिनिटांचा वेळ; दोनशे मतदान केंद्र वाढणार 
Maharashtra Water Issue: राज्यात पाणीटंचाईचे चटके; राज्यातील 455 गावांना 401 टँकरने पाणीपुरवठा
 Nashik News : नाशिक जिल्ह्यातील जलकुंभांसह पाण्याच्या स्त्राेतांचे शुद्धीकरण, जिल्हा परिषदेचे मान्सूनपूर्व अभियान 
Nashik News : नाशिककर! बोगस नळ कनेक्शन वापरताय? मनपा पथक करणार कारवाई 
Maharashtra Coronavirus Update : राज्यात मंगळवारी सक्रिय रुग्ण दोन हजारापार तर 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
GT vs RR : नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, लॉकी फर्गुसनला हार्दिकने वगळले, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Ind vs Jpn, Asia Cup Hockey : जपानविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी, 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव
Asaduddin Owaisi: भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? असदुद्दीन औवेसी यांचा सवाल
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल, अधिकृत घोषणा लवकरच करणार: संजय राऊत

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares