Onion Rate : कांदा दरासाठी आता आंदोलनाचा पवित्रा, शेतकरी उतरले रस्त्यावर – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
May 24, 2022 | 12:55 PM
मालेगाव :  (Onion Rate) कांद्याच्या घटत्या दराला घेऊन राज्यभर वेगवेगळ्या पध्दतीने निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी फुकटात कांदा वाटला जात आहे तर काही ठिकाणी कांदा जनवरांच्या दावणीला टाकला जात आहे. असे असतानाही (Government) सरकार कांदा दराला घेऊन गंभीर नाही. त्यामुळे न्याय, हक्कासाठी (Nashik Farmer) नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या बाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको केला होता. कांद्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असून कांद्याला किमान दर ठरवून देण्यात आला तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. तर सध्याच्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांनी हताश न होता प्रशासनाला जेरीस आणणे गरजेचे असल्याचा सूर आंदोलना दरम्यान उमटला गेला.
कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे पण तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून कांदा दरात घसरण सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यापासून सुरु असलेली घसरण ही अजूनही सुरुच आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर हे 3 हजार रुपये क्विंटल असे होते तर आता 2 ते 3 रुपये किलो असा दर मिळत आहे. कांदा हे नगदी पीक असून यामधून उत्पादन वाढावे हाच उद्देश शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. मात्र, सरकारची धोरणे आणि वाढलेल्या आवकचा पिरणाम हा कायम कांदा दरावर राहिलेला आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा तालुक्यात दोन ठिकाणी रास्तारोको करण्यात आला होता. ज्या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होतात त्या ठिकाणी रास्तारोको करुन सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर कांद्याला किमान आधारभूत दर ठरवून देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर दुसरीकडे नामपूर-तहाराबाद रस्त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. रास्तारोकोमुळे सकाळच्या प्रहरी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटत्या दराबद्दल सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

कांदा हे नगदी पीक असल्याने लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. नुकसानीचा विचार न करता कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढत आहे. मात्र, योग्य असा दर मिळत नसल्याने नुकसान हे ठरलेलेच आहे. दराच्या बाबतीत हे पीक लहरी असले तरी अधिकतर वेळी शेतकऱ्यांचेच नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares