Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 May 2022 12:38 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Sindhudurg Agriculture news
Sindhudurg Agriculture news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्या उपाययोजना अपयशी ठरल्या. आता तिलारीतील मोर्ले गावात ‘कोरबेटी फांऊडेशन बांदा’ यांनी सेन्सर सायरन बसवले आहेत. हत्ती त्या मार्गावरुन जर जात असतील तर हा सायरन आपोआप वाजणार आहे. हत्तीच्या ये जा करण्याच्या मार्गावर 100 मिटरच्या अंतरावर हे सायरन बसवले आहेत.
सायरनचा आवाज येताच त्या मशीनला बसवलेल्या लाईट चालू होतील. हे मशीन प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या आहेत. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे मशीन मोर्ले गावात बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हत्ती गावच्या वेशीवर येताच गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे.


तिलारी खोऱ्यात हत्तींचा उच्छाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. अन्न व पाणीसाठा यामुळे तिलारीत विसावलेल्या रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू या बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. मे महिन्याच्या हंगामात फणस खाण्यासाठी कधी कधी रात्रीच्या वेळेस हे हत्ती अगदी घरालगत येत आहेत. 
नागरिक भितीच्या छायेखाली
हत्तीचा असा वावर वाढल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. तर कधी कधी भर रस्त्यावर हत्तींचा कळप नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांचा भीतीनं थरकाप उडत आहे. हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या उपाययोजना तकलादू पडल्या आहेत. आता तर हत्तीचा वावर लोकवस्तीत वाढू लागल्याने तिलारी खोऱ्यातील हत्तींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात हत्तींना मोठ्या प्रमाणात फणसाच नुकसान केले आहे, त्यामुळे फणसाचे उत्पादन कमी झाले आहे.  तसेच नारळाची, केळीची बाग, बांबू याचेदेखील हत्तींनी मोठं नुकसान केलं आहे. शासन याठिकाणी कोणतेही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत शासन करते. त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 
महत्वाच्या बातम्या:
Damini App : भू विज्ञान मंत्रालयानं आणलं विजेची पूर्वसुचना देणारं ‘दामिनी अॅप’, जीवितहानी  टाळण्यासाठी ठरणार वरदान 
Mango News : हापूसला मिळतोय 150 ते 300 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फटका, अपेक्षीत दर किती?
लाल मिरचीचा ठसका! आवक घटल्याने दर वाढले, आगामी दोन महिन्यात आणखी भाव वाढणार
Watermelon News : कलिंगडाची ‘लाली’ उतरली, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, लाखो रुपयांचा फटका 
Tomato Price : टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री
GT vs RR : नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, लॉकी फर्गुसनला हार्दिकने वगळले, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Ind vs Jpn, Asia Cup Hockey : जपानविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी, 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव
Asaduddin Owaisi: भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? असदुद्दीन औवेसी यांचा सवाल
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल, अधिकृत घोषणा लवकरच करणार: संजय राऊत
राज यांच्याविरोधात ट्रॅप: मनसे आणि राष्ट्रवादीत ट्विटरवर रंगले फोटो वॉर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares