बोलून बातमी शोधा
शिरपूर (जि. धुळे) : शिरपूर-सावळदे रस्त्याच्या कामावर (Road Construction) तीन वर्षात सुमारे तीन कोटी रुपये खर्च झाले असूनही अद्याप रस्त्याची दुरवस्था कायम आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी करुन धुळे जिल्हा जागृत जनमंचतर्फे पदाधिकाऱ्यांनी मंगळवार (ता.२४) पासून धरणे आंदोलन (agitation) सुरु केले. (Dhule Disctrict Jagruti jan Manch agitation against bad roads Dhule News)
संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सरोज पाटील, किसान सभेचे अॅड. हिरालाल परदेशी, शेतकरी विकास फाऊंडेशनचे अॅड. गोपालसिंह राजपूत, गोपाल मारवाडी, राजेश मारवाडी, अर्जुन कोळी आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
डॉ. सरोज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना १८ मेस निवेदन दिले होते. त्यात माहिती अधिकारांतर्गत त्यांना या रस्त्यासाठी २०१९ अगोदर एक कोटी आठ लाख ३२ हजार ७२८ रुपये, २०१९ मध्ये ४१ लाख ५५ हजार ४३८ रुपये तर २०२० मध्ये एक कोटी ५० लाख रुपये असा खर्च झाल्याची माहिती मिळाली. तीन वर्षात एकाच रस्त्यावर दोन कोटी ९९ लाख ८८ हजार १६६ रुपये खर्च झालेत. मात्र तरीही रस्त्यावरील खड्डे बुजले गेले नाहीत. या कालावधीत खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याच्याकडून रकमेची वसुली करावी अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे.
हेही वाचा: Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलला
शिरपूर-सावळदे रस्त्यावरुन होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघात व रस्त्याची दुरवस्था होत असल्याने २०१६ मध्ये खर्दे ग्रामस्थांनी मोठे आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मनाई करण्याचे आदेश दिले. मात्र ही बंदी काही काळच टिकली. तेथून अवजड वाहतूक सर्रास सुरु आहे.
हेही वाचा: 73 लाखांचा गुटखा जप्त!; 2 महिन्यातील चौथी कारवाई
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news