आम्हाला कामावर पुन्हा रुजू करून घ्या – तरुण भारत – तरुण भारत

Written by

कामावरून कमी केलेल्या होमगार्डस्चे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : सखोल चौकशीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळात होमगार्ड म्हणून काम केले. जीवावर उदार होऊन सर्वांनी काम केले असताना आता त्यांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी दुसऱया व्यक्तींना नियुक्त केले जात आहे. त्यासाठी 30 ते 40 हजार रुपयेदेखील घेतले जात आहेत. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्या, या मागणीसाठी होमगार्ड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले.
काहीजण गेल्या 25 वर्षांपासून तर काही जण दहा वर्षांपासून काम करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात कोणीच काम करण्यास तयार नव्हते. त्या काळात रात्रंदिवस आम्ही काम केले आहे. असे असताना अचानकपणे आम्हाला कामावरून कमी करण्यात आले आहे.
त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत यापूर्वी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याबाबत अजून काहीच निर्णय घेण्यात आला
नाही.
एका होमगार्डचा आजाराने मृत्यू झाला आहे. त्या होमगार्डने 25 वर्षे सेवा बजावली आहे. मात्र कोणत्याच सुविधा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबावरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत विचारले असता नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन दिले जात आहे. मयत झालेल्या होमगार्डच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी प्रत्येकाकडून 500 रुपये घेतले होते. तेदेखील संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिले गेले नाहीत. एकूणच वरि÷ अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतले असून त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी राजेश गुडमेट्टी, विनोद पवार, सचिन गोजगेकर, होमगार्ड व शेतकरी उपस्थित होते.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares