बोलून बातमी शोधा
ठेकेदार, परिवहन मंडळावर फौजदारी करणार
चिपळूण, रत्नागिरी बसस्थानकाचे रखडलेले काम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर महामंडळाने एसटी स्टँड बांधण्यास ठेकेदारांना दिले; पण चिपळूण, रत्नागिरी एसटी स्टँड बांधायला घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि परिवहन मंडळाच्या बेजबाबदार प्रशासनाने प्रवाशांना अक्षरशः वेठीला धरले आहे. तसेच निवडून आलेल्या सर्व स्तरातील स्थानिक लोकप्रतिनिधींसह त्याची कोणालाही चिंता नाही, याबाबत सर्वच स्तरावर अनास्था पाहता आता काँग्रेस आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेच्यावतीने फौजदारी केस दाखल करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष शेतकरी-कष्टकरी संघटना- महाराष्ट्र राज्य यांनी केली.
याबाबत ते म्हणाले की, प्रवासी जनतेने यापुढे अन्याय सहन करू नये. प्रवास सर्वच जाती, धर्म, समाज, सर्वच राजकीय प्रक्षाच्या व संघटनेच्या लोकांना करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी मनभेद विसरून या लढ्यात एकत्र आले पाहिजे. फौजदारी खटला दाखल केल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वांना बरोबर घेऊन एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती अशोकराव जाधव यांनी दिली. या वेळी महादेव चव्हाण-अध्यक्ष चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र, अल्पेश मोरे, यश पिसे, विश्वनाथ किल्लेदार, उत्तम गायकवाड, दीपक दळवी, विचारे, अनंत धामणे, दीपक निवाते, अॅड. जीवन रेळेकर, पप्याशेठ साळवी आदी उपस्थित होते.
————–
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news