औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यात वर्षानुवर्षे पाण्याचा अभाव का आहे? – InMarathi

Written by

मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…"InMarathi"…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 
===
ऋतुचक्र अविरत सुरु आहे. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूमधून आपण जीवन जगात असतो. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात तर भारतातील शेती हा जुगार आहे हे वाक्य कोरलेलं आहे. कारण खरोखर भारतात सतत ओला किंवा सुका दुष्काळ पडतच असतो.
दुष्काळ म्हणजे पाण्याची कमतरता. कधी ती अतिवृष्टी होऊन होते किंवा अनावृष्टी होऊन ही स्थिती ओढवते. महाराष्ट्रात आपले काम तडाखेबंदपणे करणारा हा दुष्काळ जास्तकरून औरंगाबाद मराठवाडा यांच्या वाट्याला सतत येताना दिसतो.तुलनेने पश्चिम महाराष्ट्र पाण्याच्या बाबत नशीबवानच आहे. पण मराठवाडा औरंगाबाद यांना वारंवार दुष्काळाला तोंड द्यावे लागते. नुकतंच भाजपने औरंगाबाद शहरात पाण्याची कमतरता या कारणावरून आंदोलन केले.
दरवर्षी उन्हाळा आला की ऐरणीवर येणारा प्रश्न असतो तो पाण्याचा. महाराष्ट्रातील कित्येक भागात पाणीपुरवठा अनियमित, कमी दाबाने होतो. काही काही ठिकाणी तर आठ आठ दिवस पाणी येत नाही.शासन टँकरने पाणी पुरवठा करते. पण दरवर्षी हा प्रश्न जास्तच बिकट होताना दिसतो.
 
आपणही यावर्षी ऊन खूप जास्त आहे. मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी उन्हाळा जास्त कडक आहे असं न चुकता म्हणतो. पण ही गोष्ट अगदी खरी आहे की दिवसेंदिवस उन्हाळा हा तीव्र होत चालला आहे. आणि दुष्काळ पण…
पुरेसा पाणीसाठा नसणं म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे हे टप्पे बहुतेक बऱ्याच प्रदेशात आहेत. उन्हाळा जितका तीव्र होतो तितके पाणीसाठे आटत जातात. हे जलसंकट अतिशय भीषण आहे. त्याचा परिणाम केवळ शेतीवर होत नाही तर, जनावरे, मानवी जीवन यानाही भोगावा लागतो.
आणि महाराष्ट्रात तर अनेक जिल्हे हे पाणी टंचाईने ग्रासलेले आहेत.खासकरून मराठवाड्याला तर पाणी टंचाईचे वरदानच आहे. असं असण्याचे कारण काय असेल?
 
heatwave im 1
 
या प्रश्नावर सरकारने खूपवेळा मात करायचे अनेक प्रयत्न केले आहेत. म्हणजे कधी कृत्रिम पाऊस तर कधी जलसंधारण करून, पाणीपुरवठा संस्था सुरु करून लोकांना जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल हे बघितले आहे. पण त्यात म्हणावे असे यश काही आलेले नाही.
महाराष्ट्र हा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा भाग आहे. भरतातील १४ टक्के जलसंपत्ती पण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे तरीही गेली सहा वर्षे सतत दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर घोंगावताना दिसले आहे. हे सारे असताना जलप्रदूषण हा अजून एक वेगळा भाग आहे.
आजवरच्या इतिहासात १९७३ सालचा दुष्काळ हा भयंकर गंभीर दुष्काळ असे मानले जाई. परंतु, २०१३ साली त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात ११०८ गवे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली होती. पण २०१४ साली ही तीव्रता अजून वाढली. त्यावर्षी १९०५९ एवढी गवे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली गेली आणि यापैकी मराठवाड्यातील ८००० गावांचा समावेश होता. वर्षागणिक ही दुष्काळग्रस्त गावांची संख्या वाढतानाच दिसून येत होती. २०१६ साली २९६०० गवे दुष्काळग्रस्त घोषित केली गेली.
 
draught im
 
२०१७-१८ या वर्षात तर इतका कमी पाऊस झाला की उन्हाळ्याच्या आधी ४-५ महिने दुष्काळ जाहीर करावा लागला होता. २०१९ मध्ये तर ही संख्या अजूनच वाढली होती. ४५०० हून अधिक गावे दुष्काळग्रस्त घोषित केली गेली.
आता या आकडेवारीत एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा दुष्काळ मराठवाड्यात जास्त प्रमाणात आहे. असं होण्याचे कारण काय?
दुष्काळाची कारणे-
सगळ्यात पाहिलं कारण म्हणजे मराठवाडा हा पर्जन्यछायेच्या भागात येणारा भाग आहे. पर्जन्यछाया म्हणजे,असं प्रदेश ज्या प्रदेशाला लागून मोठी पर्वतरांग असते. त्यामुळे ढग अडवले जातात आणि पर्वताच्या पलीकडील भागात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो आणि ते पावसाळी ढग मराठवाड्यात येईपर्यंत रिकामे झालेले असतात.
 
marathwada im 1
 
२) जलसंपत्तीचे असमान वाटप-
त्याचबरोबर अजून एक कारण आहे ते म्हणजे, नदीखोरे पातळीवरील पाण्याचे समान वाटप न होणे. आजवर यावरून अनेक वादविवाद झाले आहेत. पाणी पेटले, जलयुद्ध अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. या असमान वाटपामुळे मराठवाड्यातील धरणे ही कमी भरतात.शिवाय जे पाणी उपलब्ध होते त्याचा योग्य वापर न होणे, त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता नसणे हे एक मोठे कारण आहे.
 
marathwada im 2
 
३) जलव्यवस्थापनाचा अभाव-
ज्याप्रमाणे पाण्याचे वाटप नीट होत नाही त्याचप्रमाणे मिळणारे पाणी योग्य रीतीने वापरले जात नाही. पाण्याच्या नळांची गळती न काढल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. त्याचाही परिणाम पाणी न मिळण्यावर होतो. जनतेमध्ये जलसाक्षरतेचा अभाव आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा ही गोष्ट लोक मान्यच करत नाहीत.
 
marathwada im 3
 
 
४) राजकीय अनास्था-
बऱ्याच पाणीपुरवठा सोसायट्या सुरु केल्या तरीही त्या पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. खूपदा सिंचनप्रकल्प एकदा राबवले की झाले. त्यांची देखभाल, दुरुस्ती यांच्याकडे फारसे आस्थेने पहिले जात नाही..
५) इतर करणे-
वास्तविक मराठवाड्यातील हवामान आणि पाण्याची कमतरता पहिली तर ते ऊस या पिकाला उपयुक्त नाही. परंतु ते नगदी पिक आहे त्यामुळे बरेच शेतकरी ऊस लागवड करतात.आणि ऊसाला पाणी जास्त लागते त्यामुळे त्याचा वापर फार होतो. कमी पाण्यात जी पिके येतात ती घेतली तर हा प्रश्न निकाली निघायला हरकत नाही. याशिवाय भूजलाचा अमर्याद उपसा केल्यामुळे त्याचा परिणाम नद्यांवर पण होतोच.
 
Sugarcane-A-Brief-inmarathi
 
याशिवाय वृक्षतोड हे एक कारण आहेच. शेती, रस्ते बांधणी अशा अनेक कारणांनी तोडलेली झाडे ही दुष्काळाच्या मुळाशी आहेत. खोल गेलेल्या विहिरी, बंद पडलेले हातपंप, दूर दूर पाण्याच्या शोधात जाणारे लोक हे सारे पाहून दुष्काळाची तीव्रता सतत जाणवत रहाते.
या साऱ्यावर उपाय काय ?
दुष्काळ हा कधी नैसर्गिक असतो तर मानवनिर्मित देखील. या दुष्काळावर मात करण्यासाठी मानवी प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत. काय आहेत हे उपाय?
१) वृक्षारोपण-
झाडे ढगांना अडवतात आणि पाऊस पडतो हे जलचक्र आपण लहानपणापासून अभ्यासले आहे.आता ही बेसुमार वृक्षतोड थांबवून नवी झाडे लावणे हा एक उपाय आहे ज्याने ही दुष्काळाची परिस्थिती बदलायला हातभार लागेल.
 
tree inmarathi
 
२) जलसाक्षरता-
लोकांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन करण्याची वृत्ती जोपासायला मदत करणे. पाण्याचा व्यवस्थित वापर कसा करावा, पाणी वाया घालवू नये यासाठी त्यांच्यात जलव्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे. पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देणे. रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत जागरूक करणे इत्यादी गोष्टीनी आपण दुष्काळावर मात करू शकतो.
 
panamik hot water InMarathi
३) शेततळी बांधणे –
प्रत्येक शेतात जलयुक्त शिवार सारखे प्रकल्प राबवून शेततळी बांधण्याला प्रोत्साहन देणे. ज्यामुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठून राहिलं आणि त्याचा वापर पिकांसाठी करता येईल.
 
jalshivar im
 
४) जल प्रकल्पांची निगा राखणे दुरुस्ती-
सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण मोडीत काढून असे जलप्रकल्प जनतेच्या मदतीने सुरळीत कसे चालवता येतील हे पाहणे हे या सगळ्याचे चोख उत्तर असेल. गाव करी ते राव काय करील ही म्हण जनशक्तीच दाखवून देऊ शकेल.
 
farming inmarathi


५) योग्य पिके घेणे-
मराठवाड्यातील हवामान हे ऊस पिकासाठी अजिबात उपयोगी नाही. कारण तिथे पाण्याची कमतरता आहे. आणि ऊसाला खूप पाणी लागते. त्यापेक्षा ऊस हे पिक न घेता इतर जिरायती पिके घेऊन पाणी वाचवणे शक्य होईल.
 
onion farmers inmarathi1
 
शेवटी काय जल ही जीवन है… पण ते सांभाळून वापरले तरच जीवन सुरु राहील… नाही का?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Your email address will not be published. Required fields are marked *source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares