Maharashtra News Live Update : तो मी नव्हेच! अनिल परबांचा सातराबारा कोरा करणार, किरीट सोमय्यांचा इशारा – TV9 Marathi

Written by

|
May 27, 2022 | 1:59 PM
लग्नाला आलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात
तवंदी घाटातील अपघातात चार जण ठार
मृतामध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजीचा समावेश
बेळगावकडून निपाणीच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने झाला अपघात
मृत आणि जखमी सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावचे रहिवासी
खासदार नवनीत राणांबाबत मंत्री बच्चू यांचा जळगावात मोठा गौप्यस्फोट
नवनीत राणा यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना हनुमान चालीसाचा कार्यक्रम दिला
म्हणूनच  नवनीत राणा यांच्यावरचं ईडीचं संकट टळलं, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला
नवनीत राणा यांच्या पोस्टरवर मोदी आणि शहा यांचे फोटो झळकले असावेत, असा चिमटा पण त्यांनी काढला
आर्यन खानला मोठा दिलासा
आर्यन खानला एनसीबीकडून क्लीनचीट
एनसीबीनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं
ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला क्लीनचीट
Cruise drug bust case | All the accused persons were found in possession of Narcotics except Aryan and Mohak, reads a statement of Sanjay Kumar Singh, DDG (Operations), NCB
— ANI (@ANI) May 27, 2022

केंद्रीय मंत्री राणे यांच्यासंदर्भात मोठी बातमी
नारायण राणे यांच्यावरची अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी
प्रतिभा पाटील यांच्याकडून खुप काही शकलोय, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन
-प्रतिभा पाटील यांच्याकडून खुप काही शकलोय,
– भगवान दत्तात्रेयची कृपा आहे, आज मला इकडे येता आलं
– महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे
– छ्त्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराजाची हाक सर्वांना एक करत आहेत
– राजकारणच नव्हे तर सामाजिक कार्यातही महाराष्ट्र पुढे आहे
– मुलींची पहिला शाळा महाराष्ट्रातच सुरू झाली
– पहिला महिला डॉक्टरही याच महाराष्ट्रातील आहे
– लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125वा वर्षांचा शुभारंभ सोहळा
– कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती
– राज्यपाल, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची उपस्थिती
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची सायबर फसवणूक
क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरट्यानी पावणे चार लाख लुटले
आंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्गत गुन्हा दाखल केला
बोनी कपूर यांच्या खात्यातून 3 लाख 82 हजार लंपास करण्यात आलेत
आंबोली पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे
यूट्यूबर अभिमन्यू गुप्ता पोलिसांच्या ताब्यात
गुप्ता याला व्हीबी नगर पोलिसांनी घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये केली अटक
सकाळी व्हिडीयो बनवायचा रात्री घरं फोडायचा
चोरी केल्यानंतर बाहेर ठेवलेली बूटं चप्पलही चरायचा
धारदार शस्त्रे, विदेशी चलन आणि 14 मोबाईल फोन जप्त
चोरलेली बूट घालून व्हिडीयो बनवल्याने फुटलं बिंग
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळणार
बॅकांकडुन नियमित कर्जदार शेतकरी खातेदारांची माहिती घेण्याचे काम अंतिम टप्प्यात
याच आर्थिक वर्षात नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार
वर्षांपूर्वी घोषणा होऊनही कोरोनामुळे थांबले होती अंमलबजावणी
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती
आता स्वराज्याची बांधणी करण्यासाठी मी सज्ज झालोय
मला कुणाबद्दलही मला द्वेष नाहीये
न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांसाठी मी त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे
ज्या आमदारांनी माझ्या फॉर्मवर सह्या केल्या, त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे
शिवसेनेने मला ऑफर दिली होती, पक्षात प्रवेश करा आणि लगेच खासदारकीची उमेदवारी घ्या..
कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत.. की राजे कुठल्याही परिस्थिती ही निवडणूक लढवायचीच
मला कल्पना आहे, ही याच्यात घोडेबाजार आहे.
आणी घोडेबाजार मला करायचा नाही, मला सगळ्या पक्षांनी मदत करावी अशी मला अपेक्षा होती
घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीला सामोर जाणार नाही… पण ही माघार नाहीये हा माझा स्वाभिमान आहे.
माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाचीच नाही, माझ्यासाठी माझा विचार आणि माझी जनता महत्त्वाची आहे
कुणासमोर वाकून मी खासदारी घेणार नाही आणि म्हणून मावळ्यांना संघटीत करण्यासाठी स्वराज्य सज्ज आहे
माझं सगळ्यांना आवाहन आणि शिवभक्तांना विनंती आहे..
दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा कोरोना महामारीमुळे झालेला नाही.
या वर्षी ६ जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं, हे आमचं आवाहन आहे

मी त्यांना एक प्रस्ताव दिला… शिवसेनेची आणखी एक सीट त्यांची असं ते म्हणाले… शिवसेनेच्या पुढाकारून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला घोषित करा असंही म्हणाले.. तर मुख्यमंत्री मला म्हणाले की राजे ते शक्य नाही..
पण शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार करायला आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले.. दोन दिवस विचार झाला.. मग फोन आला.. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यास सांगितलंय..
अपक्ष शिवसेना पुरस्कृत बैठक द्यायची असं फोनवरुन सांगण्यात आलं…
मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि मी सुचवलेल्या सुचनांचा एक ड्राफ्ट तयार झाला, हा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे..
ओबेरॉयमध्ये बैठक झाली, शिष्टमंडळ आलं, एक मंत्री एक खासदार आणि एक स्नेही सोबत होते.
मीटिंगआधीच त्यांच्या स्नेहींनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आजही असं वाटतंय, की तुम्ही शिवसेनेत यावं
मी त्यावर म्हणाले तसं असेल तर ही मीटिंग इथंच संपली.. मग ड्राफ्ट वाचण्यास सांगितलं..
त्यानंतर ड्राफ्टमध्ये एक शब्द होता, तो फक्त दुरुस्त केला..मग मी कोल्हापुरात परतलो..
कोल्हापुरात परतत असताना वेगळ्यात बातम्या समोर आल्या.. मी वर्षावर शिवबंधन..
कोल्हापुरात गेल्यानंतर कळलं की संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली..
शिवसेना खासदारांना विचारणा केली, मंत्र्यांना विचारणा केली, मुख्यमंत्र्यांनी काही माझा फोन घेतला नाही..
मला इतकं वाईट वाटतंय, की मुख्यमंत्र्यांकडना मला ही अपेक्षा नव्हती की दिलेला शब्द त्यांनी मोडला…
महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार, त्यांनी मला खूप प्रेम दिलं
राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची दिशा काय असणार म्हणून 12 मेला पुण्यात दोन निर्णय जाहीर केले होते
त्यात मी सांगितलं होतं येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीला मी अपक्ष म्हणून पुढे येणार आहे
एका पुण्यातल्या पत्रकारानं मला विचारलं होतं, की राजे हा तुमचा भाबडेपणा नाहीये का?  मी म्हणालो हो..
पण मला सगळी गणितं माहीत होती, पुढचा प्रवास किती खडतर आहे..
मलाही स्वतःला सगळा पाहायलाचं होतं
मी प्रामाणिकपणे 15 वर्ष घर सोडून काम करतोय
पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय.
समाजाची भूमिका प्रांजळपणे मांडली
सगळी पार्श्वभूमीवर पाहून मी आवाहन केलं की सर्वपक्षियांनी मला राज्यसभेत पाठवावं
जे मी बोलणार आहे, ते बोलायची मला मुळीच इच्छा नाही, ते माझ्या तत्त्वात नाही, रक्तातही नाही
मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, कोणतंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग..
दोन खासदार मुख्ममंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले
आमची मीटिंग झाली, ठाकरेंची इच्छाय की तुम्ही शिवसेनेत यावं
मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही
दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी फोन केला, मला निमंत्रित दिलं, वर्षावर या सांगितलं
मी त्यांना भेटायला गेलो, मुख्यमंत्रीपदाचा मान ठेवला
दोन मुद्द्यांवर चर्चा झाली
आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, आम्हाला ते सोबत हवेत, असं ते म्हणाले
त्यांनी मला शिवसेनेत यायला सांगितलं, पण मी म्हटलं की मी अपक्ष लढणार आहे, त्याच क्षणी नकार दिला
संजय राऊतांकडून नितीन गडकरींचं कौतुक
विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणजे गडकरी, संजय राऊत म्हणाले
गडकरींच्या टीकेत कधीही विष नाही
नितीन गडकरींचा विकासाचा दृष्टीकोण
अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच
अनिल परबांचा सातराबारा कोरा करणार, किरीट सोमय्यांचा इशारा
साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला
रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला मग रिसॉर्ट कदमांचा कसा
कदम आणि परबांचे पोपट आता बोलायला लागले
अनिल परबांनी नौटंकी बंद करावी
1 रुपयांचा शेअर 500 रुपयात जाधवांनी विकला
यशवंत जाधव यांच्यानंतर श्रीधर पाटणकर हाजीर हो
जयप्रभा स्टुडिओ प्रश्न आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अध्यक्षतेखाली बैठक
दुपारी दोन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक
बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार
त्यासोबतच स्टुडिओ खरेदी केलेले विकासक देखील बैठकीला उपस्थित राहणार
स्टुडिओची जागा ताब्यात घेऊन विकासकांना पर्यायी जागा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता
जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी गेल्या शंभर दिवसाहून अधिक काळ सुरू आहे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचं आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात माडिया महोत्सवाला सुरुवात विभागीय आयुक्त माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात माडिया समाजाची संस्कृती नृत्य कला कौशल्य दाखविणे युवकांना सोपे व्हावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 25 शे स्पर्धक भाग घेणार
लोकनृत्य, रेला, पारंपरिक वेशभूषा, हस्तकला ,पारंपरिक खाद्यपदार्थ कबड्डी ,व्हाॅलीबाल, नौकानयन, तिरंदाजी, गुलेल यासारखे स्पर्धेच्या समावेश या महोत्सवात करण्यात आला. 28 मे च्या सायंकाळी या महोत्सवाला निरोप दिला जाईल
माडिया समाजातील व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्याील यात सहभाग घेऊ शकतात अस आव्हान ही प्रशासनाकडून करण्यात आला
मे महिण्याच्या अखेरीस अमरावती विभागातील धरणात 34.91 टक्के जलसाठा शिल्लक
अमरावती विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 47.97 टक्के इतका जलसाठा शिल्लक
अमरावती जिल्ह्यातील धरणामध्ये सर्वाधिक 43.90 टक्के इतका जलसाठा
तर वाशिम जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक कमी 21.88 टक्के जलसाठा
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त 21 अतिधोकादायक इमारतींची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
म्हाडाने पावसाळापूर्व सर्वेक्षण केले असून, यावर्षी त्यात 21 इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात गतवर्षी अतिधोकादायक जाहीर झालेल्या 14 इमारतींचाही समावेश आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने जाहीर केलेल्या 21 अतिधोकादायक इमारतीमध्ये 674 निवासी व 266 अनिवासी असे एकूण 923 रहिवासी-भाडेकरू आहेत.
या इमारतींतील 190 निवासी भाडेकरू-रहिवाशांनी स्वतःची निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे.
तसेच म्हाडाने 69 रहिवाशांची संक्रमण शिबिरात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच पाच इमारतींत दुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्यातील 223 भाडेकरू-रहिवाशांना घर निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
तसेच 189 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था केली जाणार असून, त्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.
खासदार नवनीत राणांनंतर आता आमदार रवी राणांचीही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
एका तरुणाचा रवी राणा यांनाही हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह
तुम्ही हनुमानाचे खरे भक्त आहात तर हनुमान चालीसा म्हणून दाखवा
मंदिर-मशिदचे विषय काढून हिंदू मुस्लिम लोकांना लढवता
आमदार रवी राणा आणि फोन करणाऱ्या तरुणामध्ये बाचाबाची
हनुमान चालीसेचा तुम्ही विरोध करता का,रवी राणांचा तरुणाला सवाल
किरीट सोमय्यांची अनिल परब यांच्यावर टीका
आज दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परबांना उत्तर देणार, त्यांचा पर्दाफाश करणार
अनिल परब एक नंबरचे गुन्हेगार
अनिल परब यांचा 7/12 मी राज्याच्या जनतेसमोर ठेवणार
विभास साठे यांच्या घरी आज कोणतीही कारवाई नाही
काल ईडीच्या अधिकऱ्यांनी 10 तास केली कागदपत्रांची चौकशी
महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती
मात्र, सकाळपासून कोणतीही कारवाई नाही
पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या द पँलेडीयम या सोसायटीत ईडीनं धाड टाकली होती
नाहूर स्थानकाच्या जवळपास पावसामुळे सिग्नल यंत्रणेमध्ये सकळी साडेसहा वाजता बिघाड झाल्याने रेल्वे सेवा खोळंबली होती. काही वेळा नंतर सिग्नल यंत्रणा नीट झाल्यानं पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटे उशिराने धावत आहे.
वीजप्रवाह खंडित झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने
वीजप्रवाह खंडित झाल्याने लोकल सेवेवर परिणाम
कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठीच्या गाड्या आरक्षित
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांतील आरक्षण क्षमता संपली
26 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान अनेक गाड्यांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत कोणताच बदल नाही
विद्यापीठानं परीक्षेसंदर्भात भूमिका केली स्पष्ट
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि प्रचलीत पद्धतीनेच होणार त्यात कोणताही बदल नाही
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेताना एम सीक्यू पद्धतीने घ्या विद्यार्थ्यांची मागणी होती
मात्र आता परीक्षा पद्धतीत बदल करणं शक्य नसल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे
20 जूनपासून विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होतीये…
आज सकाळी दहा वाजता भाजप नेते किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
आज सकाळी १० वाजता माझा नीलम नगर निवासी कार्यालय येथे मी टी वी चॅनल, पत्रकारांशी बोलणार.
अनिल परब चा खोटारडेपणा व घोटाळ्याचे पुरावे देणार
आणि
आणखी एका नेत्याचा घोटाळ्या वरील कारवाई ची माहिती देणार@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 27, 2022

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये राज्यामध्ये आंतरराज्य बैठक
या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांमधील धरणांचा पाणीसाठा आणि त्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन चर्चा
मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर धरणांचा पाणीसाठा कशाप्रकारे नियोजन करायचा यासंदर्भात सूचनांचे झालं आदान-प्रदान
महाराष्ट्रातून पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामधील पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्नाटक मधील अलमट्टी, हिप्परगी धरणाचे मुख्य अभियंता यांच्यात झाली बैठक
बैठकीत कोयना, अलमट्टी, वारणा, दूधगंगा आणि राधानगरी धरणसाठा या संदर्भात झाली चर्चा
धरणामुळे पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नियोजन बैठक संपन्न
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत गोधन 2022- देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके उद्घाटन समारंभ
कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना तुर्तास तरी कर सवलत नाही
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या गावांना मुख्यसभेनं 17 ते 25 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय घेतला होता
मात्र, आयुक्तांनी कर सवलतीचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात टाकलाय
महापालिकेच्या विधी विभागाच्या मान्यतेसाठी पाठवून मुळ करसंकलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत
आता राज्य सरकाकरकडे अभिप्राय पाठवून निर्णय आल्यावरच मुख्यसभेच्या उपसूचनांवर निर्णय घ्या असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय…
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी केवळ दहा रुपये शुल्क
– 10रुपये परिक्षा शुल्क आकारल्याने महाविद्यालयांमध्ये नाराजी
– विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच होणार उन्हाळी परिक्षा
– विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन बहुपर्यायी पद्धतीने होणार
– विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयाला ॲानलाईन प्रश्नपत्रिका पाठवणार, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे ॲाफलाईन परिक्षा
– प्रश्नपत्रिका प्रिंट करण्याचा खर्च 10 रुपयांपेक्षा जास्त येणार असल्याने महाविद्यालयांमध्ये नाराजी
धान खरेदीसाठी केंद्र सरकारने मर्यादा घातल्याने शेतकरी नाराज
– अतिरिक्त धान कुठे विकायचा? शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला सवाल
– केंद्र सरकारने महाराष्ट्राला घातली अकरा लाख टन धान खरेदीची मर्यादा
– प्रत्येक जिल्ह्यात घान खरेदीची मर्यादा असलेल्याने शेतकरी नाराज
– राज्यातील 9 जिल्ह्यात 1 लाख 33 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे केली नोंदणी
– केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी
अनिल परब यांना लक्ष्य केल्यानंतर आत्ता केंद्रीय यंत्रणा ‘मातोश्री’च्या भोवताली?
परबांनंतर आता ‘मातोश्री’च्या भोवताली फास आवळण्याची तयारी
परबांनंतर आता ‘मातोश्री’ लक्ष्य, सूत्रांची माहिती
ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर काल छापे टाकल़े
स्वइच्छेनं देहविक्री गुन्हा नाही. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
स्वइच्छेने देहवीक्री करणाऱ्या प्रौढ व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याचे निर्देश
कायदेशीर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश
देहविक्री व्यवसायातील महिलांच्या पुनर्वसनाबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारशींच्या अनुशंगाने सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागपूरातील गंगाजमुना वेशावस्तीत आनंद
200 वर्षे जुनी गंगाजमुना येथील वेशाव्यवसाय काही महिन्यांपूर्वी नागपूर पोलीसांनी केला होता बंद
राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनं दुसरा उमेदवार दिला
शिवसेनेमुळे संभाजीराजे छत्रपती यांची चांगलीच कोंडी
संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार
पुढील दिशा स्पष्ट करणार संभाजीराजे
चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय
मुंबई : आज शुक्रवार, 27 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनं दुसरा उमेदवार दिल्यानं संभाजीराजे छत्रपती यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशावेळी संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. यामुळे चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Published On – May 27,2022 6:25 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares