Prashant Jagtap | 'सैरभैर टोळी'च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत… – Policenama

Written by


Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…
Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री…
Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते (BJP Leader) सैरभैर झाले आहेत, तर या ‘सैरभैर टोळी’चे प्रमुख असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे मानसिक संतुलनच बिघडलेले आहे. त्यातूनच, ते काहीही बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. ‘ना घर का ना घाट का,’ अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोक्याचे आहे. त्यामुळे, त्यांनी घरी जावे. घरातील माय-माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहात असतील. दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार (Mental Treatment) करून आराम करावा, असा सल्ला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपवर हल्लाबोल केला.
 
चंद्रकांत पाटील यांनी संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिला वर्गाबाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत, त्या मातृसंस्थेची काय मानसिकता आहे, हे दिसून आले आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करीत आहेत, हे पाहण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी (Women Empowerment) लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar ) यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रिया सुळे यांना घरी बसविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आतापर्यंत ते कितीवेळा तोंडावर आपटले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे, असा टोला प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी लगावला.
एकदा राज्यसभा आणि तीनवेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांना संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे, हे महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची आणि त्याबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. सुप्रिया सुळे या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच लीलया पार पाडतात, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना महिला म्हणून ‘घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा,’ असे म्हणत समस्त महिला वर्गाचा जो अवमान केला आहे, महिला शक्तीला डिवचण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जगताप यांनी केला.
 
सुप्रिया सुळे या ‘मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी (Madhya Pradesh CM) दिल्लीत जाऊन कुणाची भेट घेतली होती,’ इतका साधा प्रश्न उपस्थित केला होता. जर, भाजप नेत्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते, तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु, सुप्रिया सुळे यांनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडण्यात झाला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही, अशी टीका जगताप यांनी केली.
 
महिला वर्गाचा अवमान करून पताका फडकावल्याचा आव आणणारे पाटील यांनी घरी जावे.
आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या माय – माऊलींपुढे उभे राहून आपण करून आलेला पराक्रम सांगावा.
तेव्हा ती माय-माऊलीही तुम्हाला ‘मसणात जा’ बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.
मुळात, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार
यांनी भाजपला घरी बसविल्याचा राग या ‘सैरभैर टोळी’कडून वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे मजबूत सरकार आहे, हे या ‘सैरभैर टोळी’ने समजून घेण्याची गरज आहे.
आता घरी बसलाच आहात, तर स्वयंपाकही शिकून घ्या. त्यात कमीपणा काही नाही.
पण, जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करू लागाल, तेव्हाच तुम्हाला माय-माऊलींची किंमत कळेल, त्यांचे दु:ख कळेल, एक महिला काय करू शकते,
हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पुन्हा कोणत्याही महिलेचा अनादर करण्यासाठी तुमची जीभ धजावणार नाही,
यात तीळमात्र शंका नाही, अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
 
Web Title :- Prashant Jagtap | NCP Prashant Jagtap BJP Chandrakant Patil News
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने दिला ‘ग्लोबल मंदी’चा इशारा, जाणून घ्या कोणत्या कारणामुळे बिघडू शकते जगाची स्थिती
 
Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केले ‘हे’ आवाहन
 
8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत, 8 वर्षात मोदी सरकारने घेतले ‘हे’ 8 मोठे निर्णय
Prev Post
Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने दिला ‘ग्लोबल मंदी’चा इशारा, जाणून घ्या कोणत्या कारणामुळे बिघडू शकते जगाची स्थितीमनोरंजन
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Recently Updated
Mahatma Phule Shetkari Sanman Yojana | महाराष्ट्रातील…
Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा…
Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट…
Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची…
Latest Updates..
Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक…
Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…
Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3…
8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत,…
Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग,…
Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील…
Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले…
Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…
This Week
Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक…
Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली…
Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला…
Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट…
Most Read..
Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी देऊन उकळली 2.65 लाखाची खंडणी, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून FIR
Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या
Sanjay Raut Over ED Raids On Anil Parab | अनिल परबांच्या कारवाईनंतर शिवसेनेचा इशारा; संजय राऊत म्हणाले –…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares