बोलून बातमी शोधा
दापोली पोलिस ठाण्याचा इमारत
बांधकामाचा प्रस्ताव धूळखात
दाभोळ ः दापोली पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम हे ब्रिटिश काळातील असून, ही इमारत १०० वर्षांपूर्वीची आहे. नवीन इमारतीचा बांधकाम प्रस्ताव धूळखात पडला असून पोलिस ठाण्याला लागलेल्या आगीमुळे या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्षानुवर्षे या इमारतीच्या डागडुजीचे काम केले जात आहे. शासनस्तरावरून या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असला तरी या कामाचे अंदाजपत्रक करून निविदा काढून या कामाला सुरवात कधी होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. १८ मे रोजी पहाटे दापोली पोलिस ठाण्याच्या इमारतीत आग लागली होती. त्यामध्ये इमारतीचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पोलिस ठाण्याचे कामकाज पोलिस ठाणे आवारातील शाहिद शिंदे सभागृहातून केले जात आहे. जुन्या इमारतीला पावसापासून धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी इमारतीवर जुने पत्रे व प्लास्टिक कापड टाकणार आहे.
———-
शेतकरी संघटनेची स्थापना
दाभोळ ः कोकणातील वन्यजीवांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना स्थापन करायचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेची पहिली सभा नुकतीच जालगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केली होती. त्यामध्ये संघटित होऊन संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर भारतात जसे उपद्रवी नीलगायबाबात आंदोलन झाले आणि निर्णय झाला, त्याचप्रमाणे माकड आणि रानडुक्कर यांच्याबाबतीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन शेतकरी करणार आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
—————————
-rat27p8.jpg
L24737
– दापोली ः प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सीमामाता सालदूरे कबड्डी संघाचे खेळाडू.
————
कबड्डी स्पर्धेत सीमामाता संघ विजयी
दाभोळ ः दापोली तालुक्यातील स्वयंभू ग्रामदेवता श्री पद्मावती जाखमाता देवी मंदिर वणंद आयोजित वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मॅटवरील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा झाली. स्पर्धेत सालदुरेतील सीमामाता कबड्डी संघ विजयी, तर कर्देतील श्रीराम कबड्डी संघ हा संघ उपविजयी ठरला. श्रीराम कबड्डी संघ या संघाकडून साहिल माने, सूरज सावंत, जितू यांनी उत्कृष्ट खेळ केला; पण सीमामाता कबड्डी संघ या संघातील ओजस खेडेकर यांच्या बहारदार चढाई व आर्यन कर्देकरच्या पकडींमुळेच सीमामाता कबड्डी संघाने विजय मिळवला. शिस्तबद्ध पद्धतीने खेळत श्रीराम कबड्डी संघ कर्दे या संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेतील उत्कृष्ट पकडचे पारितोषिक श्रीराम कर्दे संघातील सूरज सावंत याला, उत्कृष्ट चढाई श्रीराम कर्दे संघातील साहिल माने तर सर्वोत्कृष्ट खेळाडू सीमामाता सालदूरे संघातील ओजस खेडेकर यांना देण्यात आले. बक्षीस वितरण संदीप राजपुरे, नितीन बांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
—————
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news