बोलून बातमी शोधा
विकासाचा झंझावात, कार्यकर्त्यांना बळ देत त्यांना स्वबळावर उभे करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व आमदार दिलीपराव मोहिते पाटील ऊर्फ अण्णा हे खऱ्या अर्थाने तरुणांचे आयडॅाल असून योग्य दिशा दाखवत सर्वांगीण विकास साधणारे तालुक्याचे लाडके अण्णा म्हणजेच आमदार दिलीपराव मोहिते पाटील. खेड तालुका ही संतांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे, याच पवित्र भूमीत शेलपिंपळगावच्या भोसे या गावात २९ मे १९५९ रोजी जन्म घेऊन अवघ्या खेड तालुक्याला आपल्या कार्यकर्तृत्वाने अण्णांनी विकासाच्या पटलावर नेले. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णांना कुठलाही राजकीय वसा वा वारसा नसताना स्वकर्तृत्वावर त्यांनी आपले राजकीय व सामाजिक अस्तित्व निर्माण केले. खेड तालुक्याच्या जडणघडणीत या अण्णांचा सिंहाचा वाटा आहे, अशा या कार्यकुशल नेतृत्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
-अॅड. अरुण मुळूक, अध्यक्ष, राष्ट्रवादी लीगल सेल, राजगुरुनगर.
आदरणीय अण्णांनी आपल्या आमदारपदाचा वापर पुरेपूर करत खेड तालुक्यातील आम जनतेच्या हितासाठी तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केला आहे व करत आहेत. पद असो वा नसो अण्णांच्या काम करण्याच्या पद्धतीवर कोणताच परिणाम झाला नाही वा होतही नाही. अगदी २००४ पासून दिवसाचा संपूर्ण वेळ सर्वसामान्यांसाठी ते देत आहेत. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे अण्णा प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत काल होते, आज आहेत व उद्याही आहेत व कायम राहणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आजही तळागाळातील जनतेच्या मनात त्यांचे आदराचे स्थान कायम असून चिरंतन राहणार आहे. आपुलकी, प्रेम व जिव्हाळ्याचे नाते त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण केले आहे. जे पोटात तेच ओठात असा स्वभाव असणारे अण्णा वेळप्रसंगी आपले परखड मत मांडायला मागेपुढे पाहत नाहीत. अण्णांनी तालुक्यात केलेल्या व सुरू असलेल्या अनेक कामांमुळे त्यांच्या कामाचा प्रभाव, दरारा आजही तालुक्यात दिसून येतो आहे. त्यांच्याकडून तालुक्याची अशी वर्षोनुवर्षे सेवा घडत राहो, अण्णांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या विकासाचा सूर्य असाच खेड तालुक्याच्या शिरावर तेजाने चमकत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून अण्णांना वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा देतो.
विकासाचा महामेरू
अण्णांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहोचवली, त्यांच्या कारकिर्दीत खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला व सुरू आहे. सन २००४ मध्ये प्रथमच विधानसभेवर प्रचंड बहुमताने व जिद्दीच्या जोरावर निवडून आल्यावर खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा ध्यास अण्णांनी उराशी बाळगला तो आजही कायम आहे. खेड तालुक्यातील गावे व वाड्यावस्त्या पिंजून काढून समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र धडपड करत आज या वाड्यावस्त्या व गावे विकासाच्या प्रवाहात आली, विकास झाला, प्रश्न सुटले. अतिशय धीरगंभीर, शांत व सतत समाजकार्यात मग्न, सतत जनतेच्या गराड्यात दिसणारा हा नेता कधी थकलेला कोणी पाहिलाच नाही. सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची जातीने विचारपूस करणारा प्रत्येकाला त्याच्या नावाने व टोपण नावाने ओळख देणारा हा नेता इतर नेत्यांपेक्षा आगळा वेगळा. पहिल्यापासून जनतेची सेवा व खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच एकमेव आमदारकीच्या सलग दहा वर्षांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने महिला महाविद्यालय, विधी महाविद्यालय, क्रीडासंकुल, जिल्हा न्यायालय व न्यायालयाची प्रशस्त इमारत, आयटीआय, साकव पूल, चांडोली ग्रामीण रूग्णालय, सभामंडप याचबरोबर डेहणे सारख्या आदिवासी भागात महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह, भीमा नदीवर बांधलेला वाळद-सुरकुंडीचा भव्य पूल, एसईझेड आणल्यामुळे तरुणांसह महिलांना निर्माण झालेले रोजगार यांसह अनेक विकासकामे मार्गी लावत अण्णांनी तालुक्याला एका उंचीवर नेऊन पोचवले आहे. विरोधकांनी चुकीचा प्रचार करून केवळ स्वार्थासाठी व राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अण्णांनी महत प्रयासाने आणलेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय अन्य तालुक्यात गेल्यामुळे तालुका सुमारे वीस वर्ष मागे गेला पण अण्णांनी हा विषय अजूनही लावून धरलेला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. अशा या निश्चयाच्या महामेरूला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.