Ajit Navale : अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचं आंदोलन, किसान सभेचा इशारा – News18 लोकमत

Written by

मशरूमच्या शेतीत हे राज्य देशात पहिले, महाराष्ट्राचा अवघ्या पॉईंटमध्ये गेला नंबर
पामतेलाच्या उत्पादनात ठरणार अग्रेसर, केरळ सरकारची योजना
कापसाला आतापर्यंतचा उच्चांकी भाव, कापूस उत्पादनात भारत स्वावलंबी होणार
यंदा खरीप पिकाचे क्षेत्र वाढणार, 18 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होणार
मुंबई, 28 मे : केंद्राने अचानक किमान आधारभूत (MSP) दराने हरभरा खरेदी बंद (chana Purchase closed)  केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी (chana crop farmer) चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजारात विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी दिला आहे. (kisan sabha ajit navale)
केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे. यावेळी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी जोरदार टीका केली.
हे ही वाचा : Ajit Pawar : अजितदादांचा शेतीविषयक अभ्यास आणि कामाच्या स्टाईलपुढे कृषी अधिकाऱ्यांची भंबेरी
नवले म्हणाले की, हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते नवले म्हणाले.
राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठवण्यात आले होते. रीतसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करुन आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे.
हे ही वाचा : Weather update : पुढच्या 72 तासांत monsoon केरळमध्ये दाखल होणार, राज्यातील 'या' भागांना वादळी पावसाचा Alert
शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 23 मे रोजी अचानक खरेदी बंद झाल्यामुळे केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याचे अजित नवले म्हणाले.
महाविकास आघाडीकडून केंद्राला विनंती
याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares