Cotton Farm : कापसाला आतापर्यंतचा उच्चांकी भाव, कापूस उत्पादनात भारत स्वावलंबी होणार – News18 लोकमत

Written by

राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी-योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन
मशरूमच्या शेतीत हे राज्य देशात पहिले, महाराष्ट्राचा अवघ्या पॉईंटमध्ये गेला नंबर
पामतेलाच्या उत्पादनात ठरणार अग्रेसर, केरळ सरकारची योजना
Ajit Navale :अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचं आंदोलन, किसान सभेचा इशारा
मुंबई, 28 मे : जगातील महत्त्वाच्या पिकांमध्ये कापसाच्या पिकाची ओळख आहे. (Cotton Farm) कापूस उत्पादनात भारत हा जगातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणार देश आहे. (India cotton farm) भारतातील शेतकरी बीटी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. एकूण कापूस क्षेत्राच्या 88 टक्के क्षेत्रात बीटी कापसाची लागवड केली जाते यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (cotton grower farmer) चांगले उत्पादन मिळते. सध्या कापसालाही विक्रमी भाव मिळत आहे. कापसाला भाव (cotton rate) चांगला मिळत असल्याने शेतकरी आगामी खरीप हंगामात (kharif sowing) जास्तीत जास्त क्षेत्रात कापूस पिकवण्याचा विचार करत आहेत.
पाण्याचा निचरा होणारी काळी माती कापूस लागवडीसाठी उत्तम मानली जाते. हे दीर्घ कालावधीचे नगदी पीक असल्याने त्याला संतुलित पोषण आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी कापूस लागवडीचे नियोजन केले असेल तर माती परीक्षण करून घ्यावे. यामुळे पोषण व्यवस्थापनास मदत होईल. पेरणीपूर्वी माती फिरवणाऱ्या नांगराने खोल नांगरट करणे आवश्यक आहे. त्यानंतर एक किंवा दोन पद्धतीने शेतीची मशागत करावी. यानंतर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर मारून जमीन भुसभुशीत करून सरळ पट्टे पाडून रानाचे सपाटीकरण करावे.
हे ही वाचा : Weather update : पुढच्या 72 तासांत monsoon केरळमध्ये दाखल होणार, राज्यातील 'या' भागांना वादळी पावसाचा Alert
कापूस लागवडीसाठी शेत तयार करताना अशी काळजी घ्या
उन्हाळ्यात, नांगरणीनंतर लगेचच, एक एकरमध्ये 1 क्विंटल निंबोळी घाला. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते कुटून पाच किलो निंबोळी किंवा कडुलिंबाचे तेल प्रति एकर एक लिटर प्रमाणे टाकू शकतात. असे केल्यास, कीटकांची अंडी आणि रोग निर्माण करणारे घटक जमिनीतील नष्ट होतात. सरी सोडताना बेडची लांबी 3.6 फूट व रुंदी 1.6 फूट ठेवावी, तर बागायती स्थितीत लांबी व रुंदी 4-4 फूट ठेवण्याचा प्रयत्न करा. बागायती स्थितीत झाडांमधील अंतर 2 फूट असेल तर बागायती स्थितीत 3.6 ते 4 फूट ठेवावे. बियाणे 5 ते 6 इंच खोल खड्डा करून पेरावे लागते, परंतु पेरणीपूर्वी शेण व जिप्सम टाकल्यास कापूस चांगल्या पद्धतीने उगवतो.
हे ही वाचा : Ajit Navale : अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचं आंदोलन, किसान सभेचा इशारा
ज्या भागात पाण्याची सोय आहे, तेथे कपाशीची पेरणी मे महिन्याच्या मध्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली तर चालेल, याचबरोबर पावसावर अवलंबून असलेल्या भागात पावसाळा सुरू झाल्यानंतर पेरणी करावी. या भागातील शेतकरी जूनच्या मध्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करू शकतात.
कापसाचे चांगले पीक आणि उत्पादनवाढीसाठी बियाणांची निवड खूप महत्वाची आहे. दरम्यान सध्या नवनवीन सुधारित वाण आले आहेत. पुसा 8-6, एलएस-886, एफ-286, एफ-414, एफ-846, गंगानगर अगेटी, बिकानेरी नर्म, गुजरात कॉटन-14, गुजरात कॉटन-16 आणि एलआरके-516 ही वाण अमेरिकन पद्धतीचे आहेत. जर संकरित वाणांची लागवड करायची असल्यास फतेह, LDH-11, LH-144, धनलक्ष्मी, HHH 223, CSAA-2, उमाशंकर, राज HH-116 आणि JKHY-1 या वाणांची लागवड करता येईल. देशी वाणांची पेरणी करायची असेल, तर एचडी-1, एचडी-107, एच777, एच-974, डीएस-5 आणि एलडी-230 या महत्त्वाच्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares