Dehydration : पुरेसं पाणी पिऊनही होतं डिहाइड्रेशन, जाणून घ्या लक्षणं – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 May 2022 10:25 AM (IST)
Edited By: स्नेहल पावनाक
Dehydration Causes
Dehydration Symptoms : अनेकदा शरीरात पाण्याची कमी जाणवते, याला डिहायड्रेशन असे म्हणतात. जर तुम्हाला डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची कमतरता टाळायची असेल, तर तुम्ही दररोज पुरेशा प्रमाणात म्हणजेच 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. पण काही वेळा योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशन होते. लघवी पिवळी होणे, श्वासाची दुर्गंधी, घाम न येणे किंवा फारच कमी घाम येणे ही सर्व डिहायड्रेशन होण्याची लक्षणे आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशन का होते यामागचं कारण जाणून घ्या.
1. पाणी पिण्याची चुकीची पद्धत
काही लोक एकाच वेळी एक लिटर पाणी पितात आणि नंतर तासनतास तहानलेले राहतात किंवा त्यांना पाणी पिण्याची आठवण राहत नाही. असे केल्याने तुमच्या किडनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. इतकं पाणी एकाचवेळी प्यायलं की लघवी लवकर होत. यामुळे शरीरातील पाणी निघून जातं. त्यामुळे एका वेळी एक किंवा दोनच ग्लास पाणी प्यावे.
2. तुमच्या शरीरानुसार मुबलक प्रमाणात पाणी प्या
पाण्याच्या बाबतीतही प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते. सर्वसाधारणपणे 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची गरच प्रत्येक व्यक्तीला लागू होईलच असे नाही. कारण क्रीडापटू, शेतकरी किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते कारण त्यांना जास्त घाम येतो. त्यामुळे 10 ग्लास पाणी प्यायल्यानंतरही त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते.
3. इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता
शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असल्यास पुरेसे पाणी प्यायल्यानंही डिहायड्रेशन होते. सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी इलेक्ट्रोलाइट्स संपूर्ण शरीरात द्रव योग्य प्रमाणात वाहून नेण्याचं काम करतात. यामुळे किडनीला योग्यरित्या काम करण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे देखील निर्जलीकरण होते.

4. निदान न झालेला मधुमेह
जेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर ही साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम करते. ज्या लोकांना पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनची समस्या आहे, त्यांनी त्यांच्या लघवीची वारंवारता आणि प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. आवश्यक असल्यास, मधुमेह चाचणी देखील करा.
5. शरीराला योग्य पेय मिळत नाही
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही द्रवपदार्थ घेतले आहे ते तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी काम करत आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण कॉफी, कोल्ड कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रिंक्सपासून ते सोडा ड्रिंक्सपर्यंत या सर्व गोष्टी तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचे काम करतात. म्हणजेच ते स्वतः तुमच्या शरीराला हायड्रेशन देत नाहीत आणि तुमच्या शरीरात असलेले पाणी फ्लश करण्याचे कामही करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Green Coffee : ‘ब्लॅक कॉफी’नंतर आता ‘ग्रीन कॉफी’, जाणून घ्या फायदे
Health Tips : …म्हणून झोप पूर्ण झालीच पाहिजे!
Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, ‘ही’ आहेत लक्षणे
Navi Mumbai : 14 महिन्यांच्या चिमुकलीच्या फुफ्फुसात अडकला शेंगदाणा; ‘ब्रोन्कोस्कोपी’ द्वारे काढण्यात आलं यश
World No-Tobacco Day 2022 : धूम्रपान करणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! तुम्हालाही अंधत्व येऊ शकतं
दहापैकी एका पतीने पत्नीच्या हातचा मार खाल्ला; शहराच्या तुलनेत गावातील पती जास्त मार खातात
Raj Thackeray : राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, लवकरच मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा
शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा फाडला; संजय राऊतांचा टोला 
Bacchu Kadu : ठाणेदाराचा डबा, हसीलदारांच्या घरी… राज्यमंत्री बच्चू कडूंची अशीही मेजवानी
मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारच्या सचिव पदाच्या निवडयादीत समावेश

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares