Maharashtra Breaking News 28 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 28 May 2022 08:37 PM (IST)
आम्ही बोललो की देशद्रोह होतो. कितीही ईडीची भीती दाखवली तरी शिवसेना झुकणार नाही आणि महाराष्ट्र वाकणार नाही, असा टोला शिवसेना संजय राऊत लगावला आहे. 
नागपूरातील हनुमान चालीसा पठणानंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

कोल्हापूरची अंबाबाई हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. अंबाबाईने शिवसेनेला भरभरून दिलं असून आत्ता महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या विरोधी पक्षाला सद्बुद्धी दे, अशी प्रर्थना अंबाबाई चरणी केल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.  
औरंगाबाद शहरात 24 वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जयश्री रितेश पाटील असे मृत विवाहितेचे नाव आहे. वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह घाटी रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Konkan News Updates : कोकणात ज्या भागात रिफायनरी होणार आहे त्याठिकाणच्या आसपासच्या गावांमध्ये सध्या खोदकाम सुरु आहे. दरम्यान यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. जागा मालकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता होत असलेले खोदकाम नेमके कोण करतंय याबाबत शंका आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन देखील याबाबत अंधारात आहे. ज्या ठिकाणी सध्या खोदकाम केले जात आहे त्याठिकाणी रिफायनरीचे क्रूड ऑइल टर्मिनल उभारले जाईल अशी शक्यता आहे. सध्या रिफायनरीबाबत अद्यादेश निघालेला नसताना होत असलेला खोदकाम कोण करतंय? स्थानिकांचे काय म्हणणे आहे? असे सवाल निर्माण होत आहेत. 
kirit somaiya on anil parab :  अनिल परब यांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, मुंबई उच्च न्यायालयात किरीट सोमय्या यांची याचिका
नांदगांव तालुक्यातील आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची (Death) नोंद घेतली असून, विषबाधेमुळे या माेरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 
राज्यातील जनता बेरोजगारीने त्रस्त आहे आणि मुख्यमंत्री हे राज्यावरील विघ्न आहे. हे दूर व्हावे म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठन करणार आहोतः आमदार रवी राणा
मुंबई:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावान साहित्यिक, परखड वक्ते आणि उत्कृष्ट असे संघटक होते.  उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात रान उठवले. त्यांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.”
आम्ही दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठन केले तेव्हा आम्हाला काही अडचण झाली नाही. मात्र महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठनाला एवढा विरोध का करण्यात येतो हे कळत नसल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. नागपूर विमानतळावर आगमनानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Mumbai Pune Express Highway Update : मुंबई – पुणे एक्सप्रेस मार्गावर खालापूर टोलनाका दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा, गेल्या तीन तासांपासून वाहनांची गर्दी कायम.. 
पुण्याकडे जाण्याऱ्या मार्गावर दहा लेन सुरु , तर मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन सुरू ….
 पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातही वाहतूक कोंडी, सुमारे दीड किलोमीटर वाहनांची रांग …
नागपूरात हनुमान चालीसा पठनासाठी अटींसह परवानगी मिळाल्यानंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी आहे.
Maharashtra Gondia News : 40 हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त शिपायाला अटक, बाजार निरीक्षक फरार, तक्रारदाराचं गंज बाजार येथे मालकीचं दुकान आहे. मात्र हे दुकान नोटरी करुन मुलाचे नाव लावायचे होतं, यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
Hanuman Temple Issue : नाशिक येथील हनुमान जन्मस्थळ वाद चिघळण्याची शक्यता असून आता 31 तारखेला शास्त्रार्थ सभेच आयोजन आले आहे. किष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार असून नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठ मध्ये हनुमान जन्मस्थळा बाबत महाचर्चा होणार आहे. 
Bhandara Maharashtra News :  रबी हंगाम धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश अखेर धडकले असून भंडारा जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांना हिरवी झेंडी मिळाली आहे. उन्हाळी धान खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी भंडारा जिल्ह्यात सुमारे 171 केंद्रांना तात्काळ धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग विभागाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर दिलासा मिळणार आहे. यावर्षीही धान खरेदीला 26 दिवसांचा विलंब झाला आहे.  खरीप हंगाम तोंडावर असल्याने धान विकण्यासाठी शेतकरी हा मोकळा झाला असून शासन-प्रशासन स्तरावरून तत्काळ दखल घेत भंडारा जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे 
Mumbai Pune Express Highway : मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावर ट्रॅफिक जॅम, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक वाहनांच्या रांगा, सुमारे दोन किलोमीटर तर बोरघाट पोलीस चौकीजवळ सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग.. एक्स्प्रेस मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची गर्दी…
Nashik News : नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून 12 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाही. ज्ञानवापी आणि महादेव मंदिर वाद, भोंगा प्रश्न या संदर्भात आंदोलन किंवा मोर्चा निघू शकतात, यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या काळात शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी देखील असेल.
Ambarnath News : अंबरनाथ तालुक्यातील तावली डोंगरातून उगम पावणार्‍या वालधुनी नदीचं आगळ्यावेगळ्या पद्धतीने पूजन करण्यात आलं. सात विविध रंगांच्या साड्या वालधुनी नदीला प्रतिकात्मकपणे अर्पण करुन पूजन करण्यात आलं. यावेळी महिलांनी खणा नारळाने नदीची ओटी भरुन तिचं पूजन केलं. अशाप्रकारे नदीचे पूजन ही महाराष्ट्रातील पहिली घटना असेल. वरुणराजाने कृपादृष्टी करावी आणि शेतकऱ्याची शेती सुजलाम सुफलाम करावी यासाठी नदी मातेचे पूजन करुन तिला या माध्यमातून साकडं घातलं जातं. अंबरनाथ तालुक्यातून उगम पावणारी ही नदी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरातून वाहते आणि पुढे खाडीला मिळते. एरवी दुथडी भरुन वाहणारी ही नदी प्रदुषणामुळे शेवटची घटका मोजत होती. मात्र आता गेल्या 105 दिवसांपासून अंबरनाथ नगरपरिषद आणि काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.  
Hingoli News : जिल्हा नियोजन समितीच्या कामाचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या सरपंच आणि दोन ग्रामसेवकांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2012 ते 2017 कालावधी दरम्यान सेनगाव तालुक्यातील धानोरा इथल्या तत्कालीन महिला सरपंच द्रौपदा कऱ्हाळे आणि दोन ग्रामसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचा मंजूर निधीचे बनावट कागदपत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत.
शरद पवार आणि नितीन गडकरी यांना देणार डी. लिट. ;  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, कुलगुरू  डॉ.प्रमोद यवले यांची माहिती 
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आज भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियम येथे सभा घेणार आहेत. ही सभा संध्याकाळी 7  वाजता होणार आहे.
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा  दुपारी 3 वाजता
आयएनएस गोमती युद्धनौकेचे डीकमिशनिंग होणार आहे. नेव्हल डॉकयार्ड येथे या युद्धनौकेच्या डीकमिशनिंग (सेवामुक्त होणार आहे )चा कार्यक्रम पार पडेल. या जहाजाने 34 वर्षांपासून देशाची गौरवशाली सेवा केली आहे आणि सध्या हे भारतीय नौदलातील सर्वात जुन्या युद्धनौकेपैकी एक आहे. या कार्यक्रमला वाईस अडमीनरल अजेंद्र बहादूर सिंह सह इतर महत्वाचे नौदल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे 5 वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता राजकोटमधील एका रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर अमित शाह तटरक्षक दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
आज दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे हनुमान चालिसा पठण होईल. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वेळ दिला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना काही अटींवर नागपुरातील राम नगर मधील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परवानगी देत असताना त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करूनच त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी ‘एबीपी माझा’ आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
नागपुरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणांचे हनुमान चालीसा पठण
आज दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे हनुमान चालिसा पठण होईल. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वेळ दिला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना काही अटींवर नागपुरातील राम नगर मधील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परवानगी देत असताना त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करूनच त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता राजकोटमधील एका रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर अमित शाह तटरक्षक दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
आयएनएस गोमती युद्धनौका सेवामुक्त होणार
आयएनएस गोमती युद्धनौकेचे डीकमिशनिंग होणार आहे. नेव्हल डॉकयार्ड येथे या युद्धनौकेच्या डीकमिशनिंग (सेवामुक्त होणार आहे )चा कार्यक्रम पार पडेल. या जहाजाने 34 वर्षांपासून देशाची गौरवशाली सेवा केली आहे आणि सध्या हे भारतीय नौदलातील सर्वात जुन्या युद्धनौकेपैकी एक आहे. या कार्यक्रमला वाईस अडमीनरल अजेंद्र बहादूर सिंह सह इतर महत्वाचे नौदल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे 5 वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल.  
राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा  दुपारी 3 वाजता
ओवैसी यांची भिवंडीत सभा
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आज भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियम येथे सभा घेणार आहेत. ही सभा संध्याकाळी 7  वाजता होणार आहे.
जमीयत उलेमा हिंद संघटनेचे मोठे संमेलन, 5000 जणांचा सहभाग
भारतीय मुस्लिमांसमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी जमीयत उलेमा ए हिंद (मौलाना महमूद मदनी ग्रुप) चे आज सहारणपूरमध्ये मोठं संमेलन होणार आहे. यामध्ये 5000 बुद्धीवादी मुस्लिम सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ज्ञानवापी मशिद प्रकरण आणि कुतूबमिनार प्रकरणावरुन देशभर सामाजिक वातावरण तापलं असताना हे संमेलन होणार असल्यांने याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे संमेलन सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. 
ओबीसी समर्पित आयोगामध्ये मतभेद
राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या बांटीया आयोगात सध्या मतभेद असल्याचं समोर आलं आहे. आयोगाचे अध्यक्ष बांटीया याचं म्हणण आहे की सध्या ओबीसी साठी केवळ सर्व्हे न करता एससी एसटी प्रवर्गाचा देखील सर्व्हे करण्यात यावा तर आयोगातील इतर सदस्यांच म्हणण आहे की हा आयोग ओबीसीसाठी तयार करण्यात आला आहे त्यामूळे केवळ ओबीसीची जनगणना करण्यात यावी. एकंदरीतच आयोगातील या मतभेदांमळे वेळेत इम्पिरिकल डेटा निर्माण होणारं का हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
Navneet Rana : नवनीत राणा आणि रवी राणांचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक, अमरावतीमध्ये जोरदार स्वागत
IPL 2022 Final : फायनलचा थरार… गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष…की राजस्थानचा ‘रॉयल मार्च?’
संजय राऊतांसाठी शरद पवारांनी मोदींची भेट घेतली पण मलिकांसाठी का नाही? ओवैसींचा सवाल
दहापैकी एका पतीने पत्नीच्या हातचा मार खाल्ला; शहराच्या तुलनेत गावातील पती जास्त मार खातात
Raj Thackeray : राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, लवकरच मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares