Video : ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, जयंत पाटलांच्या विधानानं… – TV9 Marathi

Written by

| Edited By: आयेशा सय्यद
May 28, 2022 | 5:19 PM
सांगली : सध्या हनुमान हा विषय राज्यभर चर्चेत आहे. त्यामुळे त्यावर बोलताना सगळेच जपून बोलत आहेत. सर्वसामान्यांपासून ते समाजकारणी, राजकारणी सगळीच मंडळी या प्रकरणावर बोलताना विचारपूर्वक विधान करत आहेत. अचूक टायमिंग साधत करेक्ट कार्यक्रम करणारे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी (Jayant Patil) सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला. ते सांगलीत बोलत होते. याचा व्हीडिओ सध्या चर्चेत (Viral Video) आहे.
जयंत पाटलांनी सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. माकड हे हनुमानाचा अवतार आहे. आपण त्यांना काय करणार… आता आपण हनुमान चालिसा म्हणतोय आणि त्या माकडांचा काय बंदोबस्त करणार, असं म्हणत जयंत पाटलांनी हनुमान चालिसा प्रकरणावर भाष्य केलंय. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्यांने आमच्या भागात माकडांचा त्रास असल्याचं जयंत पाटलांना सांगितलं. तुमच्या भागात झाडं जास्त आहेत. तरी इकडे माकडांचा त्रास नाही. पण आमच्या भागात मात्र आम्हाला खूप माकडांचा त्रास होतोय. यावर काहीतरी योजना करा, असं या शेतकऱ्याने सांगितलं. तेव्हा माकड हनुमानाचा अवतार असल्याने आपण त्यांना काही करू शकत नाही, असं जयंत पाटील उपरोधाने म्हणाले. जयंत पाटलांच्या बोलण्याचा मतितार्थ समोर बसलेल्या लोकांच्या लक्षात आला आणि त्यांना हसू आवरलं नाही. अन् तिथं हास्याचे फवारे उडाले. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी जयंत पाटलांना समोर अनेक समस्या सांगितल्या. काही प्रश्नांवर जयंत पाटलांनी लगोलग तोडगा काढला. पण माकडाच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांनी असं हटके उत्तर दिलंय.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares