बोलून बातमी शोधा
कोतोलीत सावरकर जयंती उत्साहात
माजगाव ता.२८
कोतोली (ता.पन्हाळा)येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली .ग्रामपंचायत सभागृह येथे पांडुरंग गांजवे यांच्या हस्ते सावरकर प्रतिमा पूजन झाले.
यावेळी स्वामी विवेकानंद तरुण मंडळाया वतीने ही स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपसरपंच राजेंद्र लव्हटे, संभाजी सुतार सागर पाटील नामदेव पाटील ,स्वप्नील आंगठेकर,किशोर सावंत,पंकज सूम्बे, सुहास सुतार ,प्रशांत सुतार, सचिन सुतार आदी उपस्थित होते .
तुरुकवाडी, ता. २८ : कोतोली पैकी इंगवलेवाडी( ता. शाहूवाडी) येथील प्रादेशिक वनक्षेत्रात वन अधिकारी व ठेकेदार यांनी सुक्या झाडांच्या फांद्या छाटणीच्या प्रस्तावाआडून हजारो ओल्या सुक्या वृक्षांची कत्तल करणा-या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी भारतीय दलित महासंघ व कोतोली ग्रामस्त यांच्यावतीने सोमवारी ( ता.३० ) शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिली.
शाहूवाडी तहसीलदार, विरोधी पक्ष प्रमुख प्रविण दरेकर , पालकमंत्री सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , वनमंत्री अदित्य ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शाहूवाडी तालुका हा वनसंपदीचा ठेवा आहे. निसर्गाने या तालुक्यावर मुक्तहस्ते उधळण केली असताना वनविभागाचे कनिष्ट ते वरिष्ट अधिकारी आर्थिक लालचेपोटी वनसंपत्ती नष्टकरु पहात आहे. शेतकरी यांना आपण लावलेले झाडा तोडण्यासाठी नवविभाग परवानगी देत नाही आणि संपुर्ण जंगल नष्ट करण्या मागे कोणते षडयंत्र रचले आहे . नवविभाग हे जनतेसाठी नसून अधिकारी यांना चरण्याचे कुरण ठरत आहे. दोषी अधिकारी यांचेवर तातडीने कारवाई करावी .
यावेळी नाना लोखंडे, आकाश कांबळे,संजय जाधव, नागेश कांबळे,सुरेश पाटील, निलेश पाटील , विलास बनसोडे, कोतोली ग्रामस्त ,दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयहिंद विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अर्जुन गायकवाड
सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर ता. २८
वाघवे (ता. पन्हाळा) येथील जयहिंद विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अर्जुन पांडूरंग गायकवाड व . उपाध्यक्षपदी मानसिंग महिपती कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. के. ठाकरे यांनी काम पाहिले. अन्य सदस्य असे – अर्जुन गायकवाड, मानसिंग कांबळे, पांडुरंग उदाळे, जोतिराम पाटील, प्रकाश पाटील, विकास पाटील, शिवाजी पाटील, शंकर पाटील ,पांडुरंग पोवार, अजित माने सौ. निता विभूते, सौ. सिंधूताई मूडेकर सौ. मंगल पाटील श्री. दुबूले ( सचिव )
……………….
फोटो
अर्जुन गायकवाड ( चेष्मा असणारे गुलाबी फेटा
मानसिंग कांबळे ( भगवा फेटा )
…..
बेलेवाडी विकास सेवा सत्तारुढ गटाकडे.
उतूर ता. २७
बेलेवाडी हुबळगी (ता.आजरा ) येथील विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्तारुढ गटाने सर्व (१३)जागा जिंकून संस्थेवर आपले वर्चस्व कायम राखले.
सत्ताधारी आघाडीचे विजयी उमेदवार ; पांडूरंग दशरथ भाकरे, रघूनाथ आनंदा शिंत्रे,जयवंत बाबूराव कुदळे, नामदेव पांडूरंग पोवार,जयवंत गणपती बिल्ले, कुंडलीक विष्णू शिंत्रे, अंकुश आनंदा हातकर,कमल सात्तापा जगताप,सातूबाई बाजीराव मोरे,विद्याराणी रामचंद्र तांबेकर, शोभा राजाराम सुतार,निर्मला ज्ञानदेव कांबळे ,वनिता शशिकांत सुतार.
चौकट.
२६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होत्या या पैकी नऊ महिला उमेदवार होत्या. यापैकी ६महिला निवडून आल्या. विद्याराणी रामचंद्र तांबेकर याना सर्वाधिक ४०८ मते मिळाली.
—++———-
अशोक तोरस्कर ,उत्तूर .
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news