Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 01 जून 2022 : बुधवार : एबीपी माझा – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Jun 2022 10:26 AM (IST)
Edited By: श्रद्धा भालेराव
Top 10 Maharashtra Marathi News
1. प्रसिद्ध गायक के.के.चं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, कोलकात्यात कॉन्सर्टनंतर तब्येत बिघडली; उपचारादरम्यान मृत्यू, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
2. अहमदनगरच्या पुणतांब्यात आजपासून शेतकऱ्यांचा एल्गार, विविध मागण्यांसाठी 5 जूनपर्यंत धरणे आंदोलन, राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार
पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या अहमदनगर येथील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात आजपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 
पाच वर्षांपूर्वी , 2017 मध्ये पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्यात तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला होता. आता, त्याच पुणतांब्यातून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

3. पावसाळ्यापूर्वी राज्यातल्या 7 जिल्ह्यात एनडीआरएफच्या 9 तुकड्या तैनात करणार, राज्य सरकारचा निर्णय, 15 जूनपासून तुकड्या रवाना होणार
4. हनुमान जन्मस्थळावरून वाद झाल्यानंतर नाशिककर हनुमान बचाव समिती स्थापन करणार, तर किष्किंधा मठाधिपती गोविंदानंद यांची आज पत्रकार परिषद
5. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि बारावीच्या गुणांना 50-50 टक्के वेटेज; पुढील वर्षापासून अंमलबजावणी, मंत्री उदय सामंत यांची माहिती
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 जून 2022 : बुधवार

6. भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंबोज यांच्या कंपनीनं 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, त्यानंतर ते कर्ज बुडवल्याचाही ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला होता. 
7. यावर्षी सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज, भारतीय हवामान खात्याकडून सुधारित अंदाज जाहीर, स्कायमेट अंदाजाबाबत साशंक
8. महाराष्ट्रातील पहिली इलेक्ट्रिक एसटी बस आजपासून धावणार, पुणे ते अहमदनगर दरम्यान सेवा, ‘शिवाई’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
9. केंद्राकडून सर्व राज्यांना 86 हजार 912 कोटी रुपयांच्या जीएसटी परताव्याचं वितरण. महाराष्ट्राला वाट्याला सर्वाधिक 14 हजार 145 कोटी, जीएसटीची सर्व रक्कम दिल्याचा केंद्राचा दावा
10. राफेल नदालची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक, उपउपांत्य फेरीत नोव्हाक ज्योकोविचचा पराभव
HSC Result Date: बारावीचा निकाल पुढील आठवड्यात, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Nagpur News : वाघिणीच्या दातानेच घेतला नवजात बछड्याचा जीव; वन्यप्रेमींमध्ये हळहळ
Maharashtra Breaking News 01 Junee 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…
Maharashtra Corona Update : कोरोनाचा वेग वाढतोय, बुधवारी राज्यात आढळले 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण, मुंबईने टेन्शन वाढवलं
Nashik Crime : नाशिक पोलिसांचा वाळू माफियांना दणका, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त 
NEET PG 2022 Result : नीट-पीजी परिक्षेचा निकाल जाहीर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना दिलासा, कर्ज प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
IPO : लवकरच ‘सुला वाइनरीचा’ आयपीओ बाजारात; 1400 कोटींच्या आयपीओ योजनेची शक्यता 
Shivsena :  औरंगाबाद नाही… संभाजीनगर, मी नाव दिलंय; बाळासाहेबांच्या आवाजातील शिवसेनेचा औरंगाबादच्या सभेचा टीझर प्रसिद्ध
मे महिन्यात जीएसटी वसुलीचा रेकॉर्ड, चौथ्यांदा वसुली आकडा 1.40 लाख कोटीच्या पुढे 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares