सत्तासंघर्ष: बंडखोर शिंदे गटाचा 12 जुलैपर्यंत गुवाहाटीतच मुक्काम; भाजप आमदारांना बुधवारपर्यंत मुंबई गाठण्या… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
गुवाहाटीत ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला आहे. हॉटेल रेडिसन ब्लू येथे आधी 30 जूनपर्यंत शिंदे गटाचे असलेले बुकींग निश्चित काळापर्यंत वाढवण्यात आले आहे अशी सूत्रांची माहिती आहे; तर दुसरीकडे भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना 29 जूनपर्यंत मुंबईत पोहचण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सूरु झालेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा कधी पडणार हे मात्र सध्यातरी स्पष्ट होताना दिसत नाही.
काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत खलबते
दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अशोक चव्हाणही आहेत. तिन्ही नेत्यांत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरांना दिलेल्या 14 दिवसांच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष दिवसागणिक बिकट होत आहे. शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तर पुण्यात बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसरीकडे, गुवाहाटीत उपस्थित शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव यांच्या नेतृत्वात राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
तत्पूर्वी, शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला. कन्नडचे बंडखोर आमदार उदयसिंग राजपूत यांनी दावा केला आहे की, आपल्याला शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यावरुन शिवसेनेने शिंदे गटावर हल्ला चढवलाय.
ज्या 15 आमदारांना केंद्राने सुरक्षा दिली आहे, ते लोकशाहीचे रक्षक नाहीत. हे लोक 50-50 कोटींना विकले जाणारे बैल किंवा ‘मोठे बैल’ आहेत, हा लोकशाहीवरचा डाग आहे, असे टीकास्त्र सामनातून करण्यात आले आहे. पुढे फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीवर देखील भाष्य करण्यात आले आहे.
मोठे अपडेट्स
गुवाहाटीत बर्थडे सेलिब्रेशन
गुवाहाटीला गेलेले भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आज वाढदिवस असल्याने् सर्व बंडखोर आमदारांनी हाॅटेल रेडीसन ब्ल्यू येथे त्यांचा वाढदिवस धमाक्यात साजरा केला. याबाबतचा त्यांचा व्हिडिओही जारी झाला असून त्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदार भोंडेकर यांना केक भरवताना दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares