संसदेत घाईघाईने पास: वीज अधिनियम 2022 ची महाराष्ट्र राज्य किसानकडून होळी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
वीज अधिनियम – २०२२ हे विधेयक भाजपाचे सरकार संसदेत घाईघाईने पास करून घेण्याच्या तयारीत आहे. देशभरातील शेतकरी आंदोलन असलेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनास हरताळ फासून हे विधेयक बहुमताच्या जोरावर बळजबरीने संमत करून घेण्याचा सरकारचा डाव आहे. जनविरोधी निर्णय जनतेवर लादले जात आहेत, असे प्रतिपादन भाकपचे राज्य सहसचिव ॲड. कॉ. सुभाष लांडे यांनी केले.
‘वीज अधिनियम – २०२२’ ची महाराष्ट्र राज्य किसान सभेकडून होळी करण्यात आली. लांडे म्हणाले, विधेयकाच्या माध्यमातून संपूर्ण वीज क्षेत्र खाजगी कार्पोरेट कंपन्यांच्या कब्जात दिले जात आहे. सर्वसामान्य जनतेला वीज महाग होणार आहे. या कार्पोरेट धार्जिण्या धोरणाचा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी जनविरोधी वीज विधेयक मागे घ्या, अशी मागणी करण्यात आली.
यासाठी भाजप प्रणित सरकारचा जाहीर निषेध करुन वीज अधिनियम २०२२ ची होळी शहीद कॉम्रेड भगतसिंह स्मारक, पत्रकार चौक अहमदनगर शहर आणि क्रांती चौक, शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, भारती न्यालपेल्ली, रामदास वागस्कर, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, तुषार सोनवणे, राजु तोरडमल, सचीन गवळी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares