Nanded : आता जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा, नुकसानभरपाई न मिळाल्यास थेट मंत्रालयातच घुसणार,… – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Aug 12, 2022 | 4:04 PM
नांदेड : अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मराठावाड्यातील (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. खरिपातील सर्वाकाही शेतकऱ्यांनी गमावले आहे. असे असताना हेक्टरी मदत रकमेत वाढ करण्यात आली हे दिलासादायक असले तरी स्थानिक पातळीवरील पंचनामे आणि (Criteria for compensation) नुकसानभरापाईचे निकष हे पायदळी तुडवले जात आहे. पावसामुळे जे नुकसान झाले आहे त्याची तर भरपाई मिळावीच पण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी (Chawa Sanghtna) आखिल भारतीय छावा संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शिवाय अपेक्षित मदत शेतकऱ्यांना मिळाली नाहीतर मात्र, शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयातच घुसणार असल्याचा इशारा नानासहेब जावळे यांनी दिला आहे. त्यामुळे नुकसानभरापाईसाठी रकमेची घोषणा झाली तरी त्याची आता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
नांदेड जिल्ह्यातील 93 पैकी 80 महसूल मंडळात सातत्याने तीन वेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्यात गेली. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने शेतजमिनीचे देखील मोठे नुकसान झालेय. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून त्यातून शेतकऱ्यांचे काहीही नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी छावा संघटनेने शुक्रवारी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाड्यांसह मोर्चा काढला. मोर्चात शेकडो शेतकरी ,छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि बैलगाड्यासह सहभागी झाले होते.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढलीय, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा देण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी घेऊन राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील छावा संघटनेने दिलाय. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे राज्य सरकारने घोषणा केली त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणेही तेवढेच गरजेचे आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांची अंमलबजावणी होतेच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यंदाही सरकारने हेक्टरी नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केली आहे. हेक्टरी शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. पण प्रत्यक्ष पंचनामे करतानाच त्यामध्ये नियमितता नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. घोषणा झाली त्याची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला आहे. भविष्यात मंत्रालयातच घुसणार असल्याचा इशारा नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.
ही बातमीही वाचा
Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares