महाराष्ट्रातलं हे गाव स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार, अमृत महोत्सवात वाचा ऐतिहासिक क्षण – MSN

Written by

सिंधुदूर्ग :
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शिरोडा गाव आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षी शिरोडा येथील मीठ सत्याग्रहसाठी झालेले आंदोलन देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ऐतिहासिकतेची आठवण करून देते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘चले जावं नारा’ दिला. त्यावेळी मिठाचा सत्याग्रह देशभर एकाच दिवशी १२ मार्च १९३० साली झाला. त्याच दिवशी शिरोडा इथे हजारो मीठ उत्पादक शेतकरी व गांधी अनुईयायानी एतिहासिक आदोलन केलं. त्याच्या स्मृतीच्या आठवणी साक्ष देणारा वटवृक्ष आज ही दिमाखात उभा राहून मीठ सत्याग्रहाची साक्ष देतो.
93563839
महात्मा गांधी यांनी मीठावरील जाचक कर कमी करण्यासाठी देशभर आंदोलन केले. त्याचप्रमाणे शिरोडा इथेही आंदोलन करत हजारो गांधी अनुयायांनी मीठ सत्याग्रह केला होता. हजारो अनुययायांनी शिरोडा इथे ज्या वटवृक्षाखाली आंदोलन केले, त्याची साक्ष देत तो वटवृक्ष उभा आहे. जेथे आंदोलन झालं, तेथे महात्मा गांधींचे स्मारक व्हावे अशी इच्छा ग्रामस्थांची आहे.
शिरोडा गावात आजही मीठ उत्पादन केलं जात. आज ही केंद्रीय सॉल्ट विभागाचे कार्यालय आहे. जेथे मीठ सत्याग्रह झाला. तेथे गांधींचे स्मारक होईल असे माजी मुख्यमंत्री शरद पवार तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गांधींजीचे स्मारक व्हावे अशा भावना व्यक्त केल्या. पण आज ही स्मारक झालेले नाही. हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावे, ही गावकऱ्यांची इच्छा आहे.
93540023

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares