Independence day 2022 : पेट्रोलला शंभर रुपये मोजतो, मग देशी गायीच्या दुधासाठी पैसे देताना कुरकूर का? – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शेती क्षेत्र
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी सध्या आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नाविषयी फेरविचार करण्याची वेळ आली आहे. हे केले नाही तर आपली नैसर्गिक परिसंस्था तर धोक्यात येईलच; पण त्याचबरोबर मानवी आरोग्यापुढेही गंभीर प्रश्‍न तयार होतील. ‘कोविड’च्या प्रकोपाने आपले डोळे उघडले आहेत. ही जागरूकता कायम ठेवून उत्तम आरोग्य आणि मजबूत युवा पिढ्यांसाठी प्रत्येकाने विषमुक्त अन्नसाखळीचा भाग बनले पाहिजे. निरामय जीवनासाठी हा अन्नयोग समजून घेणे आवश्यक आहे.
भौतिक
शेतीतील उत्पन्न आत्मिक समाधान देणारे, त्यामुळे शेती व्यवसायाची सतत सुरू असणारी घसरण रोखण्याची गरज. सन १९६० मध्ये देशांतर्गत ढोबळ उत्पादनात (जीडीपी) शेती क्षेत्राचा वाटा ६४ टक्के होता, तो सन २०२२ मध्ये १३ टक्क्यांवर आला.
२०१५-१६ च्या कृषी गणनेनुसार अल्प व अत्यल्प (५ एकरांपेक्षा कमी) भूधारकांचे प्रमाण ७९.५ टक्के. शेतीविकासापुढील हे सर्वांत मोठे आव्हान. गटशेती किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीला बळ द्यायला हवे. प्रभावी तंत्रज्ञानाचा आणि या क्षेत्रात सुरू झालेल्या स्टार्टअप्सचा उपयोग विषमुक्त अन्नसाखळी मजबूत करण्यासाठी करून घेतला पाहिजे.
राज्यात गेल्या साठ वर्षांत पीकरचनेत मोठा बदल झाला. १९६० मध्ये एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ७७ टक्के क्षेत्र अन्नधान्य (तृणधान्य व कडधान्य) पिकांखाली होते. २०२० मध्ये हे क्षेत्र ५९ टक्क्यांवर उतरले आहे.
अन्नधान्य पिकांचे क्षेत्र घटले असले तरी उत्पादकता जवळपास दुप्पट झाली आहे. राज्यात १९६० मध्ये ५० टक्के क्षेत्रावर ज्वारीची लागवड होती, ती आता १३ ते १४ टक्क्यांवर आली आहे.
नगदी पिकांचे (उदा. सोयाबीन, कापूस, ऊस, फळबागा) क्षेत्र वाढले आहे.
सन १९६० मध्ये राज्यात फळे व भाजीपाला लागवडीचे क्षेत्र नगण्य होते, २०२० मध्ये ते १२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
——————–
भविष्यातील अपेक्षा
वाढीव उत्पादनापेक्षा अधिक पोषणमूल्य असलेल्या शेतीवर भर हवा, त्यासाठी सरकारने शेतीखालील क्षेत्र वाढवावे.
—————
भविष्यातील अपेक्षा
गव्हामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याने पारंपरिक ज्वारी, बाजरी, नाचणी आदी धान्यांचा वापर नागरिकांनी करावा. आरोग्यदायी, विषमुक्त अन्नाचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे.
—————
भविष्यातील अपेक्षा
आरोग्यदायी अन्नासाठी अधिकचे पैसे मोजण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी. आपण पेट्रोलला शंभर रुपये मोजतो, मात्र आपल्या आरोग्यासाठी आवश्यक देशी गायीच्या दुधाला शंभर रुपये मोजताना कुरकूर का करतो?
—————–
भविष्यातील अपेक्षा
सर्वांनाच हे अन्न आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. मात्र आठवड्यातून एकदा तरी देशी गायीचे दूध, सेंद्रिय भाजीपाला घ्यावा. त्यासाठी छोट्या पॅकेटमध्ये हे दूध उपलब्ध झाले पाहिजे.
—————–
भविष्यातील अपेक्षा
सेंद्रिय अन्न साखळी निर्मिती आणि व्यवस्थापनाबाबत दिशादर्शनासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. धोरणनिश्‍चितीमध्ये नागरिकांचाही (ग्राहक) सहभाग हवा.
————–
भविष्यातील अपेक्षा
दीर्घकालाचे नियोजन करून टप्प्याटप्‍प्याने शेती व्यवस्था आणि ग्राहकांची मानसिकता बदलाला प्राधान्य द्यायला हवे. हा बदल एका रात्रीत होणार नाही. तसे करायला गेले तर श्रीलंकेसारखी अवस्था होऊ शकते.
आध्यात्मिक
भगवद्‌गीतेमधील एका श्लोकात म्हटले आहे, की सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती अन्नापासून होते. अन्न हे पर्जन्यापासून उत्पन्न होते आणि पर्जन्य यज्ञापासून. यज्ञ कर्मातून उत्पन्न होते. यज्ञातील अग्नीला दिल्या जाणाऱ्या आहुती सूर्यकिरणांमध्ये स्थित होतात आणि पुढे त्यामुळे पर्जन्य मिळते. त्यामुळे मानवी जीवनात अन्नयोगाचे महत्त्व मोठे आहे.
शेती अन्न देते. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जारज्जू आणि शुक्र या सप्तधातूंचे पोषण अन्न करते. त्यातून ओजस वाढते. हा अन्नयोग केवळ शेतीतून साधता येतो.
आपण जसे खातो तसे बनतो किंवा रोगी शेतात तयार होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे शेतीत नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करावा.
वाढत्या आजारांमुळे सातत्याने औषधे घेण्याची सवय वाढत चालली आहे. त्यापेक्षा शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर हवा. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजणे कधीही श्रेयस्कर.
अनेक ऋषी-मुनींनी शेतीविषयी ज्ञानसंपदा निर्माण केली. पारंपरिक शेतीचे प्रगल्भ ज्ञान आणि पंचांगातून मिळणारे ऋतुमानाचे संकेत यामुळे भारतीय शेती बहरली. तिची पुनर्स्थापन करणे गरजेचे.
पराशर ऋषींचा ‘कृषी पराशर’ आणि ऋषी वराहमिहीर यांचा ‘बृहतसंहिता’ हा ग्रंथ भारतीय शेतीचे पारंपरिक ज्ञान देतो. यात शेती पद्धतींबरोबरच भूजलाचे स्रोत व आढळ, पर्जन्य व मॉन्सूनचा अंदाज याविषयीची माहिती आहे.
४.४ टक्के (२०२१-२२)
११.७ टक्के (२०२०-२१)
महाराष्ट्राचा कृषिविकास दर
सन १९६० : ६४ %
सन २०२२ : १३ %
शेतीचा राज्याच्या जीडीपीतील वाटा
भारत : ३४९६८००.३४ टन
महाराष्ट्र : ७५२१७६.२३ टन
सेंद्रिय शेतीतील उत्पादन (सन २०२१-२२)
आपली पारंपरिक शेती ही प्रामुख्याने सेंद्रिय घटकांवरच आधारलेली होती. रसायनांच्या अविवेकी वापरामुळे लाखो वर्षांपासून जोपासलेली शेतजमिनीची सुपीकता गेल्या ३० ते ४० वर्षांत लयाला गेली. त्याचा मानवी आणि एकूणच सजीवांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. आपल्याला पुन्हा टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. आमच्या शासनाने नागरिकांची सेंद्रिय अन्नाप्रती जागरूकता वाढवण्यासाठी प्रचंड काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातून आपल्या आणि पुढील सर्व पिढ्यांच्या सुरक्षित, पोषक अन्नाची गरज भागू शकेल.
– अंकुश पडवळे, अध्यक्ष, महाऑरगॅनिक अॅण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा), पुणे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares