PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार 11व्या हप्त्याची रक्कम, यादीत तपासा तुमचे नाव – Times Now Marathi

Written by

PM Kisan Samman Nidhi 11th Installment Update : नवी दिल्ली :  पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) 11 वा हप्ता जारी करणार आहेत (PM Kisan 11th Installment Released). लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. पीएम किसान योजनेच्या 11 व्या हफ्त्याची अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहात आहेत. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. जर तुम्हीही या योजनेत अर्ज केला असेल, तर ताबडतोब यादीत तुमचे नाव तपासा. (Farmers to get 11th Installment of PM Kisan Samman Nidhi Scheme very soon, check your account)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीएम किसान योजनेंतर्गत 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जातात. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. म्हणजेच हे बघितले तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) आहे किंवा तुम्ही 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर पाठवू शकता. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नाही ते अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती त्वरित तपासू शकता. येथे चरण-दर-चरण प्रक्रिया पहा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares