आयकर भरणारेही घेत होते pm kisan samman nidhi, कारवाईच्या भीतीने 185 शेतकऱ्यांनी लाखो रुपये केले परत – News18 लोकमत

Written by

फडणवीस राजीनामा देतील? मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर राष्ट्रवादीचा निशाणा
पहाटे 3 वा. उठला; 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चिरला गळा, सकाळी म्हणाला…
‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब
'कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..'; मोदींच्या टीकेवर अजित पवारांचं उत्तर
झाशी जिल्ह्यातील 2 हजार 489 शेतकरी अपात्र ठरवून त्यांना रक्कम परत करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यातील लाभार्थ्यांची शासकीय स्तरावर चौकशी केली असता, टॅक्स भरणारे 2 हजार 489 शेतकरी असल्याचे समोर आले. तसेच या योजनेचा लाभ घेत आहेत. हे सर्व अपात्र ठरवून त्यांना नोटीस पाठवून पैसे परत पाठविण्यास सांगितले आहे. 
हे ही वाचा : IIT Bombay ला मिळाले दोन फ्लॅट, माजी प्रोफेसरच्या कुटुंबियांनी घेतला कौतुकास्पद निर्णय
नोटिसा बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता मिळत राहिला, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा कृषी अधिकारी केके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे शेतकरी आयकर अंतर्गत येतात आणि सन्मान निधी देखील घेत होते, त्यांना नोटीस बजावून रक्कम परत करण्यास सांगण्यात आले होते. कृषी विभागाने वसुलीसाठी यादी तयार केली असून आतापर्यंत 185 अपात्र शेतकऱ्यांकडून 12 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. स्वेच्छेने रक्कम परत न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क 
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Kisan, Pm modi, Uttar pardesh, Yogi Aadityanath

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares