रानभाज्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
43396
जामसंडे ः येथील रानभाजी महोत्सवाची पाहणी करताना आमदार नीतेश राणे आदी.
(छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
रानभाज्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना
नीतेश राणे; जामसंडेतील रानभाजी महोत्सवास भेट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः रानभाज्या महोत्सवासारख्या उपक्रमांमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मोठा वाव आहे. अशा उपक्रमांना राज्य शासनाकडून ताकद मिळण्यासाठी शासनस्तरावर आपले प्रयत्न राहतील. यासाठी बचतगटांनी राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा संबधित यंत्रणेकडे कळवाव्यात, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), येथील पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित रानभाज्या महोत्सवाला आमदार श्री. राणे यांनी रविवारी (ता.१४) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर तालुका कृषि अधिकारी कैलास ढेपे, तालुका शेतकरी सल्ला समिती (आत्मा) अध्यक्ष महेश पाटोळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, अमोल तेली, संदीप साटम, योगेश चांदोस्कर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, "कोरोनामध्ये रानभाज्यांचे महत्व अधोरेखित झाले. तंदुरूस्त राहून शारिरीक प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य आहाराची गरज असते. त्यामुळे भविष्यात अशा वस्तुचे मार्केटिंग झाले पाहिजे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास संधी आहे. याला शासनाकडून ताकद मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यावर भर राहील. त्यामुळे बचतगटांनी आपल्या समस्या, अपेक्षा यंत्रणेमार्फत मांडाव्यात. आत्मा तसेच कृषी विभाग याला पुढे चाल देण्यास मदत करेल.’’ श्री. ढेपे यांनी प्रास्ताविक केले.
……………………..
चौकट
शेतकऱ्यांचा गौरव
यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते तालुका भातपीक स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत अनुक्रमे विलास मिराशी, प्रशांत फाळके, शामसुंदर काडगे आदी शेतकरी पहिले तीन आले. तसेच काही बचतगटांचा सन्मानही यावेळी झाला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares