Nashik : अभोणा-कनाशी रस्त्यावर प्रचंड खड्डे | Latest marathi News – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अभोणा (जि. नाशिक) : येथील चौफुलीपासून अभोणा-कनाशी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कनाशी रस्त्यालगत कळवण कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे आवार असून, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कांदा व आपला शेतमाल विक्रीसाठी ट्रॅक्टर, पिक-अप व ॲपे रिक्षाच्या सहाय्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत आणावा लागतो. मात्र या परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. (Abhona Kanashi road with huge potholes Nashik Latest Marathi News)
शेतमाल विक्रीसाठी येणारी वाहने अवजड असल्याने खड्ड्यांमुळे अनेकवेळा ट्रॅक्टर व कांद्याची ट्रॉली उलटली आहेत. कष्टाने पिकविलेला कांदा चिखलपाण्यात पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय खड्डे टाळण्याच्या नादात अनेकदा वाहनांची समोरासमोर धडक होऊन काही अपघातही झाले आहेत.
बऱ्याचवेळा वादविवादही होतात. राजेंद्र फर्टिलायझर या दुकानासमोर अक्षरशः तलावच तयार होतो. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी कळवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कांदा मार्केट व भुईकाटे यामुळे या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. शिवाय सापुताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहनेही याच मार्गाने जात असतात. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मात्र खड्डे व वाहनांची वर्दळ यांचा प्रचंड त्रास होत आहे.
हेही वाचा: Nashik : अंतापूर रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी
हीच परिस्थिती नांदुरी व चणकापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही झाली आहे. कुंडाणे गावाजवळील कांद्याच्या शेडसमोर रस्ता आहे की नाही, हेच कळत नाही. अभोणा शहराभोवती रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. संबंधित विभागाने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
"परिसरातील शेतकरी व स्थानिकांना खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास होत आहे. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही काही उपयोग झाला नाही. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ न झाल्यास संबंधित विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल. मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित विभागालाच जबाबदार धरले जाईल. "
-अंबादास जाधव, शिवसेना, तालुकाप्रमुख, कळवण
हेही वाचा: वनोलीचा भूमिपुत्र कजाकिस्तान येथील स्पर्धेचा 'Iron Man'
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares