कोणावरही ना मुख्यमंत्र्यांचा, ना खऱ्या मुख्यमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
मुंबई – आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले ? –
या सरकारला शेतकऱ्यांचा आवाज एकू येत नाही, महीलांचा आवाज एकू येत नाही. ना मुंबईबद्दल यांना काही काळजी आहे. जनता आम्हाला नक्की न्याय देईल अशी खात्री आहे. हे आंदोलन गद्दारांच्या विरोधात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ही राजकारणाची भाषा नाही गुडांची भाषा –
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरुन वाद होत होत आहे, त्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली. त्याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, हे डरपोकांचे विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे, असे मला वाटत नाही. म्हणून अशी गुंडगिरीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? गुंडगिरीची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकारणात कधीच नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छितात त्यांना हे मान्य आहे का? मी त्यांचा राजीनामा मागणार नाही. त्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल. महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे मोकाट फिरत असतील तर पुढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काय हाल होणार आहेत. यावरुन आपल्याला अंदाज येईल.”
निष्ठावंतांना स्थान नाही –
मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळाले, मिळाले नाही याचा विचार करत आहे. पण एक नक्की आहे. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. डाऊनरेट झाले आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेले नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवले आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळालेले नाही.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares