बिगर 7/12 शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक: शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा; जिल्हाधिकारी कार्य… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
गायरान-शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा तापला असून, याविरोधात बुधवारी (17 ऑगस्ट) बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आक्रमक झाले.
कार्यालयावर चढले
संघटनेचे नेते भाई जगदिशकुमार इंगळे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन केले. अखेर पोलिसांनी मध्यस्ती केल्यानी आंदोलक खाली उतरले. त्यांनी अपर जिल्हाधिकारी अनील खंडागळे यांच्याशी चर्चा केली. लवकरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी काढली समजूत
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरान अर्थात ई-क्लास जमीन असून त्यावर ग्रामस्थांकडून पिके घेतली जातात. स्थानिक प्रशासन अनेकदा हे अतिक्रमरणही हटवण्यात येते. मात्र यातून संबंधित शेतकरी, शेतमुजरांचे प्रचंड नुकसान होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना ई-क्लास जमीनीवर पेरणी करण्यात आलेली पिके घरात येईपर्यंत सवलत द्यावी आणि शासन निर्णयानुसार 14 एप्रिल 1990 च्या अगोदरील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे शेत नियमाकुल करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान बिगर सातबारा शेतकरी संघटना तथा दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे यांनी कार्यकर्त्यांसोबत 17 ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा न झाल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन केले. काही वेळाने िसटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकरांची समजूत काढली.
पिके उद्धस्त करू नका
त्यामुळे मुद्दा चर्चेत
मूर्तिजापूर तालुक्यातील. शासकीय 85 एकर जमिनीपैकी एकूण 70 एकर जमिनीवरील अतिक्रमण 29 जुलै रोजी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले होते. संपूर्ण शेत जमिनीवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares