Lakhimpur Kheri Protest : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आक्रमक, मंत्री अजय मिश्रांच्या अटकेसह विविध – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Aug 2022 02:06 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Farmers Protest
Lakhimpur Kheri Protest : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रींमडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांनाअटक व्हावी या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथील 4 शेतकरी आणि 1 पत्रकार यांच्या हत्येप्रकरणावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. 
गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आज संध्याकाळपासून देशभरातील शेतकरी एकत्र जमण्यास सुरुवात होणार आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडात जे शेतकरी निर्दोष असूनही कारावास भोगत आहेत, त्यांची तात्काळ सुटका करावी. त्यांच्यावरील खटले तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, सर्व पिकांना आधारभूत किंमत देण्यासाठी आणि एमएसपीपेक्षा जास्त असलेल्या सर्व पिकांच्या विक्रीची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची नेमक्या मागण्या काय आहेत
किसान आंदोलनादरम्यान केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले खटले तत्काळ मागे घेण्यात यावेत.
वीज बिल मागे घेण्यात यावे. भारतातील तमाम शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारे कर्जाचे ओझे कमी झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. 
उत्तर प्रदेशातील साखर कारखानदारांच्या वतीने शेतकऱ्यांची थकबाकी तत्काळ देण्यात यावी. 
लखीमपूर व इतर जिल्ह्यांतून देशाच्या विविध प्रांतांतून वर्षानुवर्षे जंगल वसवून आलेल्या शेतकर्‍यांना जमीन बेदखल करण्याच्या नोटिसा देणे बंद करावे.

या प्रमुख मागण्या उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुलं शेतकरी आता एकत्र जमायला सुरुवात झाली असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
 
लखीमपूर खेरी प्रकरण काय
लखीमपूर खेरी येथील तिकोनिया गावात 3 ऑक्टोबर रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि लखीमपूरचे खासदार अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. आशिष मिश्रा यांच्या वाहनांच्या ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला होता. तिकोनिया प्रकरणाबाबत विरोधी पक्षांनी सरकारला घेरले होते. आता पुन्हा या प्रकरणावरुन शेतकरी आक्रम झाले असून अजय मिश्रा यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग; गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain : भंडारा गोंदियात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
Abdul Sattar: आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा
Aurangabad: कृषी मंत्री होताच सत्तारांनी बोलावली विभागीय बैठक, नुकसानीचा आढावा घेणार
Bhandara Rain : भंडाऱ्यासह गोंदियात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट, आज येलो अलर्ट
Vinayak Mete : विनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश
मोठी बातमी! सिंचन घोटाळ्यासंबंधी अजित पवार यांना दिलेली क्लीन चिट दोन वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित
Rohingya Refugees:  रोहिंग्यांना घर देणार; केंद्र सरकारमध्येच विसंवाद? दोन खात्यांच्या दोन भूमिका
भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत पूरस्थिती कायम; अनेक मार्ग अजूनही बंद, अनेकांचं स्थलांतर
Nana Patole: दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय ! नाना पटोलेंची घणाघाती टीका

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares