Maharashtra Monsoon Assembly Session : '50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Aug 2022 12:52 PM (IST)
Edited By: स्नेहा कदम
Opposition Slogans
Maharashtra Monsoon Assembly Session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी एकत्र येऊन विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
’50 खोके एकदम ओक्के’, शिंदे गटातील आमदारांना डिवचलं
महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. 
‘आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं


तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. ईडी सरकार हाय हाय, शेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.

Maharashtra Monsoon Assembly Session आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे
सभागृहाबाहेरच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर येण्याआधीच सभागृहाबाहेरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. “या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहेत. या सरकारमध्ये अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. “आदित्य ठाकरेंची भाषा अशोभनीय आहे. बेईमानी आणि लाचारी या शब्दांचा अर्थ समजायचा असेल तर मतं घ्यायची मोदीजींचा फोटो दाखवून आणि गोदीत जाऊन बसायचं सोनिया गांधी यांच्या, हे बेईमानी नाही का? लाचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या गोदीत बसायचं, याचा लाचारी म्हणत नाही का? आदित्यजी जरा अभ्यास करा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वय आहे आणि मगच भाष्य करा,” असं आशिष शेलार म्हणाले.
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांची विधान भवनाबाहेर तुफान घोषणाबाजी

Shiv Samvad Yatra : गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दुःख : आदित्य ठाकरे
Aurangabad: निधीअभावी स्मार्ट सिटीतील रस्ते कामांना ब्रेक; 108 ऐवजी आता 24 रस्ते होणार
Mohit Kamboj Tweet : राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा?
Maharashtra Monsoon Assembly Session आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे
Ambadas Danve: मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे ब्लॅकमेलिंगचा प्रकार; अंबादास दानवेंची टीका
Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडू: पन्नीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाचा मोठा दिलासा, पक्ष प्रमुखपदावरुन पलानीस्वामी नियुक्ती रद्द
मॅंचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही, तो फक्त एक जोक होता; इलॉन मस्क यांच्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Session : अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर? मदतीच्या घोषणेनंतरही पुरवणी मागणीत तरतूद नाही
Maharashtra Assembly Session : आले रे आले, गद्दार आले…शिंदे गटाच्या आमदारांना विरोधकांनी डिवचले
LIC : आजपासून एलआयसीची बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार! कमाल सूट 3500 रुपयापर्यंत मिळणार 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares