PHOTOS : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; पाहा नेमकं काय घडलं? – Marathi Hindustan Times

Written by

Wednesday , 17 August 2022
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
(1 / 7)

Maharashtra Assembly Session 2022 : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळं विरोधकांनी शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष्य केलं आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच ‘स्थगिती सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.(HT)

(2 / 7)

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं. ‘हे गद्दारांचं सरकार असून ते कोसळणार म्हणजे कोसळणारच’, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली आहे.(HT)

(3 / 7)

Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Live : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, याशिवाय राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.(HT)

(4 / 7)

विधीमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं.(HT)

(5 / 7)

यावेळी तिथं भाजप आणि शिंदे गटाचे आमदारही उपस्थित होते.(HT)

(6 / 7)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आले त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्यासमोर ‘बेकायदा सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळं सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांना हसू आवरलं नाही.(HT)

(7 / 7)

आज विधानसभेत थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याच्या विधेयकाला बहुमतानं पारीत करण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज्यात यापुढे सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे.(Rahul Singh)

इतर गॅलरीज

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares