टुडे ४ स पटा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
44027
नेत्रदीप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार
कोल्हापूर ः केंद्राकडून जाहीर झालेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड आज महापालिकेत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना प्रदान करण्यात आला. नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ. आदित्य सिंघानिया व आदिलीला फाउंडेशनचे प्रतिनिधी डॉ. राम प्रभावळे यांनी ॲवॉर्ड, पदक, प्रमाणपत्र सरनोबत यांना प्रदान केले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई प्रमुख उपस्थित होते. यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार गवळी व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. हा ॲवॉर्ड नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, डॉ. भारती पोवार, माजी केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सरनोबत या कार्यक्रमास उपस्थित नसल्याने गुरुवारी त्यांना पुरस्कार देण्यात आला.
मुंबई हिअरिंग क्लिनिक
सेंटरची सेवा कोल्हापुरात
कोल्हापूर ः ध्वनी प्रदूषणाचे आघात किंवा अपघाताने तसेच विविध व्याधींमुळे अनेकांना ऐकण्यास कमी येणे किंवा ऐकूच न येणे अशा समस्या उद्‍भवतात. त्यांच्यासाठी अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र सुविधा कोल्हापूरमध्ये सुरू झाली आहे. श्रवणयंत्र क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सिग्नीया व शिवांतोस कंपनीने कोल्हापूरकरांसाठी मुंबई हिअरिंग क्लिनिकची सेवा राजारामपुरी तिसरी गल्ली येथे सुरू केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्‍घाटन झाले, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रशांत जाधव व शिवांतोसचे अविनाश पवार यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या ६.३ इतक्या संख्येच्या व्यक्तींना ऐकण्याची समस्या कोणत्याही वयात उद्‍भवलेली असते. त्यात वेळीच लक्ष न दिल्यास शारीरिक किंवा सामाजिक परिणामही गंभीर रूप धारण करतात. अशा स्थितीत श्रवण चाचणी वेळीच करणे, गरजेनुसार श्रवण यंत्र वापरणे गरजेचे बनले आहे. हीच सेवा मुंबई हिअरिंगने कोल्हापुरात सुरू केली असल्याचे प्रशांत जाधव, किशलय चक्रवर्ती यांनी सांगितले.

प्रा. डॉ. उज्वला बिर्जे
43855
प्रा. डॉ. बिर्जे यांना
प्रेरणा गौरव पुरस्कार
वडणगे ः येथील प्रा. डॉ. उज्वला रविराज बिर्जे यांना ज्ञानज्योति सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय ग्लोबल आदर्श प्राध्यापिका प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेट्रो रेल कॉर्पोरेशन भारत सरकार इंडस्ट्रीज असो.चे अभयदादा सोपानराव भोर, लेखक प्रकाश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. जयकर गवाळे, नंदिनी गारमेंटच्या संस्थापिका डॉ. सुमित्रा पाटील, उद्योजक दत्तात्रय पाटील, चंद्रकांत ठक्कर, संस्थापक अध्यक्षा विजयालक्ष्मी पाटील, शिंगाडे ट्रस्टचे डॉ. विक्रम शिंगाडे उपस्थित होते. सौ. बिर्जे या शिराळा येथील विश्वासराव नाईक आर्टस्, कॉमर्स अ‍ॅंड बाबा नाईक सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

कदमवाडीत शनिवारी निर्भय वॉक
कोल्हापूर ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवारी (ता. २०) कदमवाडी परिसरातून निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम होणार आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, शहीद गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा उपक्रम होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथून सकाळी आठला उपक्रमाला प्रारंभ होईल. त्यानंतर कदमवाडी माझी शाळा, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सदर बाजार ते पुन्हा राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या मार्गावरून हा उपक्रम होईल, असे जिल्हाध्यक्ष डॉ. विलासराव पोवार यांनी सांगितले.
01950
माधुरी घराळ यांची कुस्ती प्रशिक्षकपदी निवड
कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथील माधुरी गंगाराम घराळ- राष्ट्रीय महिला कुस्तीपटू (एन.आय.एस. कोच) यांची बल्गेरिया (सोफिया) येथे होणाऱ्या यु-२० ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कुस्ती प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. या स्पर्धा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान आहेत. कुस्ती प्रशिक्षकपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे व कोल्हापूर तालीम संघ यांचे सहकार्य लाभले आहे. त्यांना वडील पैलवान गंगाराम घराळ यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
कर्मवीर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
सानेगुरुजी वसाहत ः इंटिटी फिनिशिंग स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सोनाळी (ता. कागल) यांच्यातर्फे झालेल्या तालुकास्तरीय शालेय भाषण स्पर्धेत फुलेवाडी रिंग रोडवरील कर्मवीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. लहान गटामध्ये वेदांत प्रताप कुपले याने तृतीय क्रमांक पटकावला. सिद्धी युवराज पाटील हिने उत्तेजनार्थ पहिला क्रमांक पटकावला. राजवर्धन कदम याने, तसेच भूमी शेळके हिने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यावर भाषण सादर केले.
स्कूलच्या सचिव डॉ. सायली कचरे, मुख्याध्यापिका जयश्री गुरव, सुपरवायझर मिरा चौगुले, शुभांगी दमे, विशाल भोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

01948
महे ः येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना एस. डी. जरग. शेजारी सज्जन पाटील, रूपाली बोराटे, नितीन जंगम आदी.
महेत शाश्वत ऊस शेतीवर मार्गदर्शन
कसबा बीड ः महे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शाश्वत ऊस शेतीवर शेतकरी मार्गदर्शन महे ग्रामपंचायत येथे झाले. मातीचे पूजन सरपंच सज्जन पाटील, उपसरपंच रूपाली बोराटे व जंगम कृषी उद्योगचे नितीन जंगम यांच्या हस्ते झाले. प्रमोद घुगे व संतोष कुंभार यांनी जमीन वाचवा अभियानाची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज असल्याचे सांगून ॲडव्हान्स पेस्टिसाइड्स कशाप्रकारे वापरावी, याची माहिती दिली. एस. डी. जरग यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बुद्धीराज पाटील, सर्जेराव हुजरे, बाजीराव जरग, हणमंत पाटील आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील यांनी आभार मानले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares