Hingoli : पंचनामे करून मदत देण्यासाठी आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पूर्णा : आठ दिवसांत पंचनामे करून मदत द्यावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बुधवारी (ता. १७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून शेवाळ आले आहे. यात खरिपातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान होऊन महिना उलटला तरी सुद्धा शासकीय कर्मचारी कोणीही बांधावर फिरकले नाहीत. जेवढे शेतकऱ्यांनी पेरले, तेवढेही उत्पादन होणार नसल्याची स्थिती सध्या आहे. एकीकडे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तसेच कारखानदारांनी एफआरपी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. काही कारखान्यांनी तर ऊस नेला, याला दोन- तीन महिने झाले. तरिही एक रुपयाही शेतकऱ्यांना दिला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
येत्या आठ दिवसांत आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास बैल गाड्या, जनावरे घेऊन तहसील कार्यालयावर मुक्काम ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा किशोर ढगे, पंडित भोसले, बालकिशन चव्हाण, भास्कर खतींग, दिगंबर पवार, मुनीर पटेल, माऊली लोखंडे, किरण गरुड, बाळासाहेब ढगे, बाळासाहेब घाटुळ, सचिन शिंदे, मंगेश कदम, रामदास लोखंडे, सुदर्शन लोखंडे, सोपान कदम, गंगाधर कदम, दत्तरामजी कदम, निवृत्ती कदम यांनी दिला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares